घरठाणेआटगाव-आसनगाव दरम्यान मालगाडीची कपलिंग तुटली

आटगाव-आसनगाव दरम्यान मालगाडीची कपलिंग तुटली

Subscribe

मध्य रेल्वे तीन तास ठप्प

मध्यरेल्वेच्या आटगाव-आसनगाव दरम्यान अप मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीची कपलिंग तुटल्याने रेल्वे वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील चार लोकल रद्द करण्यात आल्या तर लांबपल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. रविवारी सकाळी नऊ च्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे संतप्त चाकरमानी प्रवाशांनी आसनगाव स्थानकावर काही काळ गोंधळ घातला. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईला जाणार महानगरी एक्सप्रेस डाऊन मार्गावरून काढून आसनगाव स्थानकावर थांबविण्यात आली. दरम्यान, मालगाडीच्या कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर बारा च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरू झाली.
मध्यरेल्वेच्या आटगाव – आसनगाव स्थानका दरम्यान किमी क्रमांक ९१/६ याठिकाणी आज सकाळी नऊ च्या सुमारास अप मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग तुटली. यामुळे अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आटगाव येथून इंजिन तसेच आटगाव, खर्डी आणि कसारा येथून कामगार वर्ग उपलब्ध झाल्यानंतर कपलिंग बदलण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरू झाली. या दरम्यान अप व डाऊन मार्गावरील प्रत्येकी दोन अशा चार लोकल रद्द करण्यात आल्याने चाकरमानी  प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तर च्या कार्यालयात गोंधळ घातला. स्टेशन मास्तर ला घेराव घालून एक्सप्रेस थांबवा अन्यथा कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा दिला. यावर आसनगाव ला येणारी लोकल वासिंद येथूनच सीएसटी ला रवाना न करता आसनगाव पर्यंत आणण्याबाबत नियंत्रण कक्षाला आसनगाव स्थानकावरून कळविण्यात आले होते. मात्र नियंत्रण कक्षाकडून याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांनी आसनगाव स्थानकावर गोंधळ घातला. अखेर प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ला जाणारी महानगरी एक्सप्रेस डाऊन मार्गावरून काढून आसनगाव स्थानकावर थांबविण्यात आल्यानंतर प्रवाशी शांत झाले.
डाऊन मार्गावरील आसनगाव व कसारा या दोन लोकल तर आसनगाव व कसारा येथून सीएसटी कडे  जाणाऱ्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या. तर सीएसटी कडे जाणाऱ्या महानगरी, राजधानी, गरीबरथ, हावडा या लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट एक्सप्रेस सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -