घरताज्या घडामोडीकाशिद समुद्रात बुडणाऱ्या तिघांना पोलीस व जीवरक्षकांनी वाचविले

काशिद समुद्रात बुडणाऱ्या तिघांना पोलीस व जीवरक्षकांनी वाचविले

Subscribe

कात्रज येथिल काशिद समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी आलेल्या तिघांना मुरुड पोलिस ठाण्याचे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस शिपाई श्री लोहार बक्कल नं 361 व काशिद किनार्यावरील जीवरक्षक राकेश रक्ते यांनी समुद्रात बुडतांना वाचविले. कात्रज येथून पाचजण स्वतंत्र गाडीने काशिदला आले असता पैकी श्रीकांत निना ढाके,गणेश प्रकाश पाटील व नयन मुरलीधर सोनवणे हे तिघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले त्यातील दोघांना पोहता येत होते तर एकाला येत नसतांनाही तो पाढ्यात उतरला त्याच्या पायाखालची वाळू लाटांनी सरकल्याने तो खाली पडला समुद्रात वाहून जाऊ लागला त्याचवेळी इतरांनी केलेला आरडाओरडा तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपाई लोहार यांना ऐकू आला.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जीवरक्षक राकेश रक्ते यास पाचारण केले.राकेशने एकाला वाचविण्याचा प्रयत्न केलि मात्र त्याचवेळी दुसराही बुडू लागला.लोहार यांनी भ्रमणध्वनीव्दारे स्पीड बोट चालकाला बोलावले त्यांनी शिताफीने त्यास वाचवले.
काळ आला होता पण….. केवळ लोहार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने आम्हाला दुसरा जन्म मिळाला.ते एखाद्या देवदूताप्रमाणे आमच्या मदतीला धावले अन्यथा काही खरे नव्हते अशी प्रतिक्रीया या तिघांनी व्यक्त केली.तर मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नितीन गवारे यांनी लोहार व रक्ते यांच्या धाडसाचे व कर्तव्याचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -