घरमहाराष्ट्रनाशिकजखमी जनावरांच्या उपचारासाठी नाशिकच्या मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टला मदतीची गरज

जखमी जनावरांच्या उपचारासाठी नाशिकच्या मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टला मदतीची गरज

Subscribe

मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टतर्फे मदतीचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांसह इतर रस्त्यावर आजारी व जखमी गायींसह इतर प्राणी आढळून येतात. त्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी नाशिकमधील मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. मात्र, घटनास्थळी औषधोपचार करताना या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आजारी व जखमी गायींसह इतर प्राण्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी हायड्रोलिक रुग्णवाहिकेची गरज असून, दात्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक शहरात जखमी, आजारी, अपघातग्रस्त व बेवारस गायींची संख्या मोठी आहे. या गायी रस्त्यावर ठाण मांडून असतात. एखाद्या घटनेत जखमी गायींवर मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टतर्फे उपचार केले जातात. प्रसंगी गायींवर पशु वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत शस्त्रक्रिया करुन बरे केले जात आहे. या गायींची मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टतर्फे सेवा केली जात आहे. मात्र, मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टला गायींची सेवा करताना अनेक अडचणी येत आहेत. मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टकडे जखमी गायींवर उपचार करण्यासाठी वाहन उपलब्ध नाही.

- Advertisement -

त्यामुळे रात्रीच्या वेळी गायींसह इतर प्राण्यांना पशू चिकित्सालयात नेताना अडचणी येत आहेत. प्रत्येकवेळी मनुष्य बळ उपलब्ध असेलच असे नाही. प्राण्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी ट्रस्टला हायड्रोलिक रुग्णवाहिकेची गरज आहे. या रुग्णवाहिकेमुळे अत्याधुनिक सोयीसुविधा असल्याने घटनास्थळी मदतीसाठी कोणीही नसले तरी उपचार करणे सोयीचे ठरणार आहे. परिणामी, गायी व इतर प्राण्यांचा जीव वाचतील.

दात्यांनी हायड्रोलिक रुग्णवाहिकेसाठी मदत करावी. शहर व जिल्ह्यात जखमी प्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास मदतीसाठी 9028175817 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्टचे पुरुषोत्तम आव्हाड यांनी केले आहे.

गायी व प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र मदतकार्य सुरू आहे. जखमी गायींवर उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत. हायड्रोलिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास गायींवर वेळेत उपचार करणे शक्य होईल. या रुग्णवाहिकेसाठी १० लाख ५० हजार रुपयांची गरज आहे. दात्यांनी मदतीसाठी पुढे यावे.
– पुरुषोत्तम आव्हाड, मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्ट, मोरवाडी, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -