घरताज्या घडामोडीUP Election 2022: सपा आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांची पहिली...

UP Election 2022: सपा आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असून समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. युपीमध्ये भाजपला गळती लागली असून भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच यूपीमधून समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल पक्ष एकत्र लढणार असून दोघांनीही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष जयंत सिंह यांनी ट्विट केलंय. मला विश्वास आहे की, दोन्ही पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीसाठी एकजूट होऊन कार्य करतील. असं जयंत सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. एक एक आमदारांच्या सहाय्याने बनणार तुमची विधानसभा, तुमचं सरकार!

- Advertisement -

राष्ट्रीय लोक दलाच्या ट्विटर अकाऊंटवर राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पक्षाची युती उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन करून दाखवणार. कारण युवा, शेतकऱ्यांच्या विकासाचा मंत्र घेऊन येताहेत अखिलेश आणि जयंत, असं ट्विट राष्ट्रीय लोक दलाच्या ट्विटर अकाऊंट करण्यात आलंय.

युपी निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅली आणि सभेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे व्हर्च्युअलच्या माध्यमातून नेते आपल्या जनतेला आणि मतदारांना संबोधित करतील. सपा आणि आरएलडी या युती पक्षाने २९उमेदवारांची नावे जाहीर करण्याआधी काँग्रेसकडून निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ही यादी जाहीर केली असून १२५ उमेदवारांपैकी ५० उमेदवारांनी संधी देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या या यादीत उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाचाही समावेश आहे.

- Advertisement -

कानपूर मतदारसंघासाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

काँग्रेसकडून कानपूर मतदार संघासाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून पाच उमदेवारांची घोषणा करण्यात आली आहे. कानपूर विधानसभेच्या १० मतदारसंघातून ५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीये. कानपूरच्या किदवई विधानसभा मतदासंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या अजय कपूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर छावणी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सोहेल अख्तर अन्सारी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महाराजपूरमधून युवक काँग्रेसचे कनिष्क पांडे, प्रमोद जयस्वाल यांना शहरातील आर्यनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. तसेच उषा राणी कोरी यांना बिल्हौर या आरक्षित जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे.


हेही वाचा : सामुदायिक शक्तींसमोर शक्तिशाली प्रवृत्ती टिकत नसते, शरद पवारांची मोदींवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -