घरताज्या घडामोडीBiggest Asteroid To Hit Earth: बुर्ज खलिफाच्या दुप्पट आकाराचा लघुग्रह येतोय पृथ्वीच्यानजीक;...

Biggest Asteroid To Hit Earth: बुर्ज खलिफाच्या दुप्पट आकाराचा लघुग्रह येतोय पृथ्वीच्यानजीक; इथे पाहा लाईव्ह

Subscribe

आज पृथ्वी जवळून एक मोठं संकट जाणार आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह हा पृथ्वीच्याजवळून जाणार आहे. आणि त्या लघुग्रहाचा पृथ्वीच्या जवळ येण्याचा प्रवास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी नासाने पृथ्वीवर मोठं संकट येणार असल्याचा इशारा दिला होता. हे संकट म्हणजे बुर्ज खलिफाच्या दुप्पट आकाराचा एक लघुग्रह आज पृथ्वीच्याजवळून जाणार आहे. बऱ्याच काळापासून पृथ्वीजवळून अनेक लघुग्रह गेले. पण सुदैवाने या लघुग्रहांची पृथ्वीसोबत टक्कर झाली नाही. मात्र आजचा लघुग्रह हा आतापर्यंत सर्वात मोठा लघुग्रह आहे. या लघुग्रहाला नाव ७४८२ (1994 PC1) असे देण्यात आहे. पृथ्वीजवळून जाणाऱ्या या लघुग्रहाचे आपण सर्व जण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतो.

माहितीनुसार, या लघुग्रहाची रुंदी सुमारे ३ हजार ५९१ फूट आहे. तज्ज्ञांच्या मते, हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे १.२ मिलियन मैलावरून जाणार आहे. संख्येनुसार जरी तुम्हाला हे खूप दूर वाटत असले तरी यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या धोक्याचे आकलन केले तर नासाच्या म्हणण्यानुसार पृथ्वीला मोठा धोका आहे.

- Advertisement -

लघुग्रह पृथ्वीपासून किती दूर? हे कसे पाहायचे?

नासाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लघुग्रह ७४८२ बाब पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये सांगितले आहे की, पृथ्वीजवळून जाणाऱ्या या सर्वात मोठ्या आकारच्या लघुग्रहावर नजर ठेवू शकता. म्हणजे तुम्ही घर बसल्या लघुग्रहाची स्थिती, तो कुठे आहे? कोणत्या वेळेत पृथ्वीच्या जवळून जाणार आहे? याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याची लिंक नासाने ट्विटमध्ये दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नासाच्या वेबसाईटवर जालं, जिथे तुम्हाला अवकाश दिसेल. Asteroid watch असे लिहिलेले वेबसाईटच्या वरच्या बाजूला दिसले. तिथे तुम्ही जाऊन लघुग्रह पृथ्वीपासून किती जवळ किंवा किती दूर आहे हे पाहू शकता.

- Advertisement -

नासा सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजने आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे की, हा लघुग्रह पोटेंशियली हजार्डस आहे. यामुळे पृथ्वीला धोका आहे. नासाच्या तज्ज्ञ बऱ्याच काळापासून या लघुग्रहावर अभ्यास करत होते. जर हा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमध्ये खेचला तर पृथ्वीसोबत त्याची टक्कर होऊ शकते. आणि एवढा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर पृथ्वीचा विशान होऊ शकतो. यापूर्वी एकदाच लघुग्रह पृथ्वीवर आदळला असल्याचे म्हटले जाते. यामुळे जगातील डायनासोर नष्ट झाले होते. तेव्हापासून अनेक लघुग्रह पृथ्वी जवळून गेले आहेत (Asteroid To Cross Earth Orbit). पण सुदैवाने कोणत्याही लघुग्रहाची टक्कर पृथ्वीसोबत झाली नाही.


हेही वाचा – अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्लात दोन भारतीयांचा मृत्यू; ‘या’ संघटनेने स्वीकारली…


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -