घरदेश-विदेशअबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्लात दोन भारतीयांचा मृत्यू; 'या' संघटनेने स्वीकारली हल्ल्याची...

अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्लात दोन भारतीयांचा मृत्यू; ‘या’ संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Subscribe

याआधीही हुथींनी सौदी अरेबियावर अनेकदा असे हल्ले केले आहेत. मात्र आता त्यांनी यूएईला लक्ष्य केले आहे.

येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरावर (UAE) मोठा हल्ला घडवून आणला आहे. या बंडखोरांनी आधी मुसाफा भागातील तीन ऑईल टँकरमध्ये स्फोट घडवून आणला, यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही आग लावल्याची माहिती समोर आली आहे. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवारी सकाळीच्या सुमारास घडली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. अबू धाबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांची ओळख पटली आहे. यामध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अबू धाबी पोलिसांच्या माहितीनुसार, आधी मुसाफा परिसरात तीन ऑईल टँकरला आग लावण्यात आली. हे टँकर ADNOC च्या स्टोरेज एरियाजवळील ICAD 3 मध्ये होते. याशिवाय, अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकाम क्षेत्रातही हल्ला घडवून आग लागल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी डब्ल्यूएएम वृत्तसंस्थेने सांगितले की, प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, लहान उडणाऱ्या वस्तू अर्थात ड्रोनच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला आहे. अबुधाबीच्या दोन्ही भागात हे ड्रोन पडले आणि त्यामुळे स्फोट झाले. अधिकार्‍यांची टीम घटनास्थळी पोहचली असून आगीवर नियंत्रण मिळाले आहे. मात्र या हल्लात कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हल्ल्याचे आणि आगीचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मात्र या हल्ल्यामुळे हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. याआधीही हुथींनी सौदी अरेबियावर अनेकदा असे हल्ले केले आहेत. मात्र आता त्यांनी यूएईला लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियातील तेल सुविधा आणि अनेक शहरांवर हुथींनी क्षेपणास्त्रे डागली आहेत. येमेन युद्धात सौदी अरेबियाच्या सहभागाचा त्यांना राग आहे.


Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही, केंद्राने नाकारली परवानगी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -