घरमनोरंजनबॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका; पण या आहेत डर्टी सिक्रेटस

बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका; पण या आहेत डर्टी सिक्रेटस

Subscribe

पुष्पा या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपट आणि तेथील चित्रपटसृष्टीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. पण जशा बॉलीवूड इंडस्ट्रीची एक काळी बाजू म्हणजेच डर्टी सिक्रेटस आहे. तशाच टॉलीवूडच्याही डर्टी सिक्रेटस आहेत.

बॉलीवूडमध्ये जशा सुशांतसिंग राजपूत, दीक्षा सॅलियन, आणि अशा अनेक कलाकारांचा मृत्यू हा गूढ रहस्य कथेसारखा आहे. तशाच काहीशा रहस्यमय गोष्टी टॉलीवूडमध्येही आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर जशा बॉलीवूड नेपोटीजमवर चर्चा सुरू होत्या तशाच टॉलीवूडमध्येही होतात. कारण येथेही स्टार्सपुत्राने कष्ट न करता सहज काम मिळते.

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला उगवता अभिनेता उदय किरण याने करियरच्या सुरुवातीला एक मागोमाग एक असे तीन सुपरहीट चित्रपट दिले होते. प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर या नवख्या तरुणाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवून टाकली होती. याचदरम्यान त्याच्या आयुष्यात ज्येष्ठ अभिनेता चिरंजीवीची मुलगी आली. धूमधडाक्यात दोघांचा साखरपुडाही झाला. नंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि दोघ कायमचे वेगळे झाले. या घटनेने उदय पुरता कोलमडला. त्याचे कामावरून लक्ष उडाले आणि तिथेच त्याचे करियर संपले. काम मिळेनासे झाले. अखेर नैराश्यग्रस्त उदयने २०१४ साली आत्महत्या करुन स्वत:ला संपवलं. य़ा घटनेने उदयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला .त्याने आत्महत्या केली की हत्या यावर त्यावेळीही बरीच चर्चा झाली. पण नंतर चर्चा निवळल्या. पण यादरम्यान टॉलीवूडमध्ये कोणीही उदयवर भाष्य केलं नाही.

- Advertisement -

दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डी ही तिच्या बोल्ड अँड ब्युटीफूल दिसण्यासाठी जितकी प्रसिद्ध होती तितकीच ती तिच्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जायची. दाक्षिणात्य चित्रपटातील कास्टींग काऊचची काळी बाजू तिने समोर आणली. चित्रपट निर्मात्याने लैंगिक शोषण केल्याचा तिने आरोप केला होता. त्यानंतर तिला काम मिळेनासे झाले. तसेच या गोष्टीचा निषेध म्हणून श्री रेड्डी त्या निर्मात्याच्या ऑफिसबाहेर टॉपलेस होऊन बसली होती.

बॉलीवूडप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटसृ्ष्टीतही स्टार्सपुत्रांना फिल्ममेकर पहीली पसंती असते. राम चरण, धनुष, ज्युनियर एनटीआर आणि दुलकर सलमान हे देखील स्टार्स पुत्र आहेत.

दाक्षिणात्य अभिनेते, कलाकार सहजा दुसरी भाषा बोलत नाहीत. एका कार्यक्रमात संगीतकार ए आर रहमान यांना एका पत्रकाराने हिंदीत प्रश्न विचारला. यामुळे नाराज झालेल्या रहमान भर कार्यक्रमातून निघून गेला. त्यानंतर त्याला ट्रोल केले गेले.

नंदामुरी बालकृष्ण हा दबंग सनकी अभिनेता आहे. तो रागात काय करेल याचा नेम नाही. एकदा त्याने बेलमकोंडा श्रीनिवासच्या वडिलांवर रागाने चक्क गोळ्या झाडल्या होत्या.

सुरेश गोपी मल्याळम स्टार होते. त्यांच्या फिल्म तेलुगूमध्ये डब झाल्या होत्या. यामुळे तेलुगू फिल्ममध्ये त्यांचा बोलबाला झाला. त्यानंतर अचानक त्यांना चित्रपट ऑफर्स येणे बंद झाले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -