घरताज्या घडामोडीपतीच्या मृत्यूनंतर आजही Amir Khanची वाट पाहतेय कमला बाई, काय आहे प्रकरण?

पतीच्या मृत्यूनंतर आजही Amir Khanची वाट पाहतेय कमला बाई, काय आहे प्रकरण?

Subscribe

आमिर कमला बाईच्या घरी एक रात्र पाहिल्याने कमला बाईचा पती कमलेश कोली सोबत आमिरची फार चांगली मैत्री झाली. आमिरने कमलेशला आपला चांगला मित्र मानला. मात्र 8 महिन्यांपूर्वी कमलेशचा उपचारांभावी मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर मदतीसाठी कमला बाई आमिर खानची वाट पाहत आहे.

भोपळच्या चंदेरीपासून जवळपास10 किमी दूर प्राणपूर नावाचे गाव आहे. या गावात 50 वर्षीय कमला बाई म्हणून एक महिला राहते. एका कच्च्या कौलारू घरात ती राहत असून तिला 9 वर्षांचा एक मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी आहे. घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने दोन्ही मुले शाळेत जात नाहीत. शाळेत न जाण्याचे कारण विचारल्यास ते मोठ्या आशेने कमलाबाईकडे बघतात. ही तिच कमला बाई आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता आमिर खानची (Amir Khan) वाट पाहत आहे. 12 वर्षांपूर्वी आमिर खान आणि करिना कपूर यांनी कमला बाईच्या घरी एक रात्र काढली होती.

आमिर कमला बाईच्या घरी एक रात्र पाहिल्याने कमला बाईचा पती कमलेश कोली सोबत आमिरची फार चांगली मैत्री झाली. आमिरने कमलेशला आपला चांगला मित्र मानला. मात्र 8 महिन्यांपूर्वी कमलेशचा उपचारांभावी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. कधी बिडी बनवण्याचे काम तर कधी साडी विणण्याचे काम करुन त्या स्वत:चे आणि मुलांचे पोट भरत आहेत. अशा परिस्थितीत कमाला बाईने आपल्या नवऱ्याचा मित्र असलेल्या आमिर खानकडे मदतीचा हात मागितला आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर मदतीसाठी कमला बाई आमिर खानची वाट पाहत आहे.

- Advertisement -

2009मध्ये थ्री इडियट्स या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिर आणि करिना कपूर प्राणपूर गावात गेले होते. तेव्हा कमलेश कोलीच्या घरी हाताने विणलेली साडी खरेदी केली होती. 6 हजारांच्या साडीसाठी आमिरने 25 हजार रुपये कमलेशला दिले होते. त्यानंतर आमिर एक रात्र कमलेशच्या घरी राहून विणकरांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. मुंबईमध्ये विणकरांसाठी एक शोरुम खोलू असे आश्वासन यावेळी आमिरने दिले होते. कमलेशला आपला मित्र समजून त्याला निशाणी म्हणून हातातील अंगठी काढून दिली होती आणि सिनेमाच्या प्रिमियरसाठी कमलेशला निमंत्रण देखील दिले होते. आमिर त्याने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी येईल अशी  आशा कमला बाईला आहे म्हणून ती आजही आमिरची वाट पाहत आहे.


हेही वाचा – Amir Khan: आमिर खानने फातिमा सना शेख सोबत केलं लग्न? व्हायरल फोटोमागे ‘हे’ आहे सत्य

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -