घरमहाराष्ट्रAmol Kolhe : अमोल कोल्हेंचा यू-टर्न; आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून केला...

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा यू-टर्न; आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून केला आत्मक्लेश

Subscribe

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. 'अमोल कोल्हे यांनी ही भूमिका एक कलावंत म्हणून केली आहे. कोल्हे यांनी ही भूमिका ज्यावेळी केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका केली म्हणजे याचा अर्थ त्यांनी गांधीजींच्या विरोधात काही केले असा होत नाही. असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत एका कार्यक्रमादरम्यान आत्मक्लेश व्यक्त केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी घाटावरील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देत आदरांजली वाहिली. याचवेळी नथुराम गोडसे यांच्या भूमिकेबाबत आत्मक्लेश करत भावना दुखावलेल्यांप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “‘व्हाय आय किल्ड गांधी ‘ चित्रपटातील माझ्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, पण या भूमिकेमुळे मी ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीच समर्थन केले नाही आणि करणार नाही असे मी वेळोवेळी स्पष्ट केले, मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रति मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले.

“ज्या तरुण पिढीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाबद्दल, राष्ट्रपित्यांबाबत, राष्ट्रपुरुषांबाबत एक संशयाचे वातावरण निर्माण होऊ नये. यासाठी मला वाटतं मी भूमिका घेणं आणि ती स्वच्छपणे समोर मांडणे मला जास्त गरजेचे वाटते. म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पूर्वसंध्येस जिथे राष्ट्रपती गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रायणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. अमोल कोल्हे यांनी हा चित्रपट राजकारणात सक्रीय होण्याआधी केला” असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. मात्र भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका – टिपण्णी केली आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेत या चित्रपटाला विरोध केला जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी ही भूमिका एक कलावंत म्हणून केली आहे. कोल्हे यांनी ही भूमिका ज्यावेळी केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका केली म्हणजे याचा अर्थ त्यांनी गांधीजींच्या विरोधात काही केले असा होत नाही. असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन केले. मात्र या सर्व वादानंतर आता अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेश करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती, ते जे करताहेत ते भविष्यात महागात पडेल ; संजय राऊतांचे टीकास्त्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -