घरताज्या घडामोडीWhatsAppने 20 लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट केले बंद ; लक्षात ठेवा 'या'...

WhatsAppने 20 लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट केले बंद ; लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Subscribe

हल्ली व्हॉट्सअ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप असून, ती सर्वांचीच मूलभूत गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने 20 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने दिलेला हा रिपोर्ट डिसेंबर 2021चा आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नोव्हेंबरमध्ये 17 लाख अकाउंटस बंद केले आहेत.

हल्ली व्हॉट्सअ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप असून, ती सर्वांचीच मूलभूत गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने 20 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने दिलेला हा रिपोर्ट डिसेंबर 2021चा आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नोव्हेंबरमध्ये 17 लाख अकाउंटस बंद केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक महिन्याला Compliance Report जारी करते. ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप कंपनी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे डिटेल्स देत असते.

व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक महिन्याला Intermediary Guidelines And Digital Media Ethics Code अंतर्गत हा अहवाल जारी करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, अहवालात शेअर केलेला सर्व डेटा 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत बंद केलेल्या भारतीयांच्या अंकाउंटचा आहे. हे अकाउंट्स Abuse डिटेक्शन च्या आधारावर बंद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही अकाउंटवरुन गैरवर्तवणूक केल्याचे आढळल्यास ते अकाउंट बंद करते. गैरवर्तवणूक करणाऱ्यांचे अकाउंट व्हॉट्सअ‍ॅप तीन टप्प्यात करते. यात अकाउंट मॅसेजिंग आणि नकारात्मकरित्या करण्यात आलेल्या प्रतिक्रिया याआधारावर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद करते. या महिन्यात एकूण 528 तक्रारी आल्या. व्हॉट्सअ‍ॅपने पुष्टी केली आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातील एकूण 20,79,000 खाती बंद केली आहेत. भारतीयांचा नंबर हा +91 ने सुरुवात होती.

whatsapp अकाउंट banned कधी करते?

whatsapp कंपनीच्या नुसार जर कोणी बेकायदेशी, अश्लील, अवमानजनक, धमकावणे, घाबरवणे, द्वेष पसरवणे, आणि जातीभेद पसरवरण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बेकायदेशीर व्यवहार, गैरवर्तन करुन चिथावणी देण्यासाठी whatsapp अकाउंट वापरण्यात येत असेल तर अशा अकाउंटवर whatsapp कारवाई करुन बंद करत आहे. तसेच कोणताही वापरकर्ता जर whatsappच्या नियमावालीचं उल्लंघन करत असेल तर त्याचे अकाउंट बंद करण्यात येत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Sunil Grover Heart Surgery: कॉमेडियन सुनील ग्रोवरवर ह्रदयाची शस्त्रक्रिया


 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -