घरताज्या घडामोडीKiran Mane: किरण मानेंची पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊस विरोधात कायदेशीर कारवाईची याचिका, ५...

Kiran Mane: किरण मानेंची पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊस विरोधात कायदेशीर कारवाईची याचिका, ५ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

Subscribe

मुलगी झाली हो या मालिकेतून कोणतीही कल्पना न देता मला काढून टाकले. पॅनोरमा इंटरटेनमेंटने अन्यायकारक आणि अपमानास्पद पद्धतीने काढून टाकल्याने मला विनाकारण मनस्तापाला सामोर जावे लागले.

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho)  मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane)  यांना काढून टाकल्यानंतर या प्रकरणाची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किरण माने यांनी राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आले. किरण माने यांनी पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊस विरोधात कायदेशीर कारवाईची याचिका करत ५ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आज शुक्रवारी किरण माने यांनी त्यांचे वकिल असीम सरोदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

किरण माने यावेळी म्हणाले, मुलगी झाली हो या मालिकेतून कोणतीही कल्पना न देता मला काढून टाकले. पॅनोरमा इंटरटेनमेंटने अन्यायकारक आणि अपमानास्पद पद्धतीने काढून टाकल्याने मला विनाकारण मनस्तापाला सामोर जावे लागले. विषय भरकटवण्यासाठी महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला याने माझी नाहक बदनामी करण्यात आली आहे. माझे कौटुंबिक नुकसान झाले. माझ्या करिअरचे देखील कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. माझी सामाजित प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसने माझी माफी मागावी आणि नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपयांचे कॉम्पेनसेशल द्यावे, अशी नोटीस माझ्या वतीने माझे वकील अमीस सरोदे यांनी केली असल्याचे किरण माने यांनी सांगितले.

- Advertisement -

किरण माने पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, आम्ही आजवर प्रॉडक्शनची वाट पाहत होती. मात्र प्रॉडक्शन हाऊस समोरच येत नाही. माझ्यासारखा प्रकार आजवर अनेक कलाकारांसोबत झाला आहे.  चॅनेलमध्ये ज्याच्यासोबत झाले त्यांनी आपल्या करिअरकडे बघून अशा  प्रश्नांवर आवाज उचलला नाही. आम्ही वाट पाहतोय प्रोडक्शन हाऊस कधी समोर येईल. सतीश राजवाडे यांनी शब्द दिला होता प्रोडक्शन हाऊसला तुमच्याकडे घेऊन येऊ मात्र ते आलेले नाही.

चॅनेलवर प्रॉडक्शनचे वर्चस्व

चॅनेलवर प्रॉडक्शनचे वर्चस्व असून सुझाना घई यांनी चॅलेनला तक्रार केली. त्या कधीच सेटवर आलेल्या नाहीत. हेड ऑफ प्रोडक्शन शानाब शेख यांनी त्यांना माहिती दिली.आम्हाला चॅनेल काही करु शकत नाही असे नेहमी म्हणायते. पॅनोरामाचे चॅनेल काही करू शकत नाही.  चॅनेवर हिंदी प्रॉडक्शन हाऊसचे वर्चस्व असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

मी अँकर नाही अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे

काही लोकांचे चॅनेल सोबत वयक्तिक लागेबांधे असतात. माझा कोणाशी संबंध नाही. अमेय खोपकर कसे दिसतात मला माहिती नाही. आदेश बांदेकर अँकर आणि निर्माते आहेत त्यांना मी ओळखतो त्याचा मुलगा स्टार प्रवाहला काम करतोय त्यांमुळे त्यांना माझ्याविरोधात बोलावे लागले असेल. पण मी अँकर नाही तर अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनय ते लिखान प्रक्रियेपासून मी कामे केले आहेत. नाट्यक्षेत्रातील सर्व अवॉर्ड मला मिळाले आहे. दोन वर्ष माझ्या मालिकात टीआरपी मध्ये आहेत.


हेही वाचा – Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ नंतर किरण माने साकारणार ऐतिहासिक भूमिका, सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -