घरदेश-विदेशSrinagar Encounter : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

Srinagar Encounter : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

Subscribe

प्रवक्त्याने सांगितले की, ठार झालेला दहशतवादी 2020 पासून सक्रिय होता आणि त्याने आजवर अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरातील झाकुरा परिसरात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. काही काळापूर्वी झालेल्या चकमकीदरम्या श्रीनगर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबा/द रेसिडेंट्स फ्रंटच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या ताब्यातून 2 पिस्तुलांसह स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

शुक्रवारी सकाळी झालेल्या या चकमकीत इकलाख हजम याला पोलिसांनी ठार केले आहे. अनंतनागच्या हसनपोरा येथील एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येच्या कटात हजमचाही हात होता. याआधी म्हणजे बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. यावेळी हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर इश्फाक मलिक उर्फ ​मुसा असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

- Advertisement -

पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, “शोपियानच्या नदीगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवांना एक विशेष सर्च ऑपरेशन सुरु केले. यातून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात होता.

या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाची तुकडी दाखल झाली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला, ज्याला सुरक्षा दलांनेही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून त्याचा मृतदेह सापडला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. शोपियानमधील बोंगम येथे राहणारा मलिक उर्फ ​​मुसा हा बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रवक्त्याने सांगितले की, ठार झालेला दहशतवादी 2020 पासून सक्रिय होता आणि त्याने आजवर अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान शोपियानमधील अमिशजीपोरा येथे नुकत्याच एएसआय शाबीर अहमद यांच्यावर झालेल्या हल्ल्यातही मलिकचा हात असल्याचे त्यांनी सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -