घरमहाराष्ट्रनाशिकवीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

Subscribe

वर्गमित्रांनी चिमुकलीच्या नावे ठेवली ७१ हजारांची सुरक्षा ठेव

बोलठाण : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील वीरमरण आलेल्या अमोल पाटील यांच्या 6 महिन्याच्या चिमुकलीच्या नावे 71 हजार रुपयांची सुरक्षा ठेव ठेवत वर्ग मित्रांकडून अमोल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी विजेच्या तारेचा धक्का लागल्याने सशस्त्र सीमा दलातील जवान अमोल पाटील यांना वीर मरण आले होते. अतिशय दुर्गम परिस्थितीमध्ये जिद्द व मेहनतीच्या जोरावर सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न अमोलने साकारले होते. संपूर्ण परिसराला हळहळ लावून गेलेल्या अमोलबाबत सर्वत्र भावनिक साथ मिळत असताना वर्गमित्रांकडून मात्र परिस्थितीची जाण लक्षात घेत अमोलच्या 6 महिन्याच्या चिमुकल्या मुलीचे भविष्य लक्षात घेता 71 हजार रुपयांची सुरक्षा ठेव देऊन जणू आम्ही नेहमीच आपल्या सुख दुःख प्रसंगात आपल्या बरोबर असल्याचे दाखवून दिला आहे.

- Advertisement -

2008 च्या इयत्ता 10वी च्या विद्यार्थी मित्रमैत्रीणींचा व्हाट्स अ‍ॅप ग्रुप असून त्यात प्रत्येकाकडून सुख-दुःखात सहभाग नोंदवला जातो. त्यातूनच वीरमरण आलेल्या अमोलच्या कुटुंबालाही मदत करण्यात आली. गावात वास्तव्य करणार्‍या मित्रांनी ही 71 हजारांची सुरक्षा ठेव पावती अमोलच्या कुटुंबाला देतांना अमोलच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले. अमोलच्या आईकडून त्याच्या लहानपणापासून आत्ता विरपूर येथे कार्यरत असताना सर्व आठवणी मित्रांबरोबर बोलून दाखवता सर्वांना अश्रू अनावर झाले. जड अंतकरणाने सर्वानी निरोप घेत मैत्रीचं नातं हे रक्ता पलीकडचे असते हे दाखवून दिले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -