घरमनोरंजन'केदारनाथ' चित्रपटाचा टीझर रिलीज!

‘केदारनाथ’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

Subscribe

बॉलीवूडमध्ये आणखी एका स्टार किडच्या पदार्पणाची सुरुवात झाली असून सैफ अली खान आणि अमृता सिग यांची मुलगी सारा हिच्या 'केदारनाथ' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

बॉलीवूडमध्ये आणखी एका स्टार किड्सच पदार्पण होत असून या अभिनेत्रीच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या केदारनाथ या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची प्रमुख भूमिका असून २०१३ साली झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तर रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर चित्रपटाचा दीड मिनिटांचा टीझर शेअर केला असून यामध्ये केदारनाथ या देवस्थानी झालेल्या पावसाच्या हाहाकाराचे दृश्य दाखवण्यात आले आहे. एक झलक… प्रकृति के क्रोध का, और साथ होगा सिर्फ प्यार, अशी टॅग लाईन याला दिली आहे.

- Advertisement -

वर्षाखेरीस चित्रपट प्रदर्शीत 

पहिल्याच चित्रपटात सारा अली खानचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये सारा ही सुशांत सिंग राजपूतसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. या टीझरमध्ये आणखी एक केदारनाथ उध्वस्थ होताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सारा अली खान आणि सुशांत हे भीषण वातावरणात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शीत होणार असून याच्या प्रदर्शनावर अनेक वादविवाद यापूर्वी समोर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -