घरताज्या घडामोडीKarnataka Hijab Row: हिजाब वादाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद, भारतविरोधात मुस्लीम राष्ट्रे...

Karnataka Hijab Row: हिजाब वादाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद, भारतविरोधात मुस्लीम राष्ट्रे एकवटली

Subscribe

कर्नाटकमधील हिजाब वादाचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले असून, भारत सरकारविरोधात मुस्लीम राष्ट्रे एकवटली आहेत. पाकिस्तान आणि तुर्कीसह इतर मुस्लीम राष्ट्रांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदींच्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये भारतातील मुस्लिमांवर अन्याय होत असून अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मुस्लीम राष्ट्रांनी केला आहे.

जानेवारी महिन्यापासून कर्नाटकात सुरू असलेले हिजाब प्रकरण मंगळवारी चिघळले. हिजाब घालून कॉलेजमध्ये आलेल्या एका मुस्लीम तरुणीला भगवा स्कार्फ आणि भगवी टोपी घातलेल्या जमावाने घेरले आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यावर जमावाला न घाबरता त्या तरुणीनेही अल्ला हू अकबरची नारेबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर कर्नाटकमधील इतर शाळा कॉलेजेसमध्येही मोठया संख्येने भगवी स्कार्फ , टोप्या घालून शेकडोंचा जमाव गोळा झाला. या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. या सर्व घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  त्यानंतर पाकिस्तानसह तुर्की आणि इतर मुस्लीम देशांमध्येही या घटनेवरून भारतविरोधात सूर उमटू लागले आहेत.  येथील वृत्तवाहीन्या, वृत्तपत्रात कर्नाटक हिजाब प्रकरणाने हेडलाईनची जागा घेतली असून भारतात मुस्लीमांवर कसे अन्याय केले जात आहेत यावर वृत्तवाहीन्यांवर चर्चा झडत आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानमधील डॉन या इंग्रजी वृत्तपत्रात कर्नाटक हिजाब वादावर एक रिपोर्टच मांडण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले. मोदींच्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये मुस्लीम आणि अल्पसंख्यांकांवर सातत्याने अन्याय होत असल्याच्या बातम्या छापण्यात आल्या आहेत. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार सत्तेत असून हिजाब परिधान करण्यास त्यांचा विरोध आहे. त्यास इतर पक्षाच्या नेत्यांनीही समर्थन केले आहे. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कट्टरपंथियांना प्रोत्साहनच मिळाले आहे. भारत एक हिंदू ऱाष्ट्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण भारतात २० कोटी मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. असे असतानाही देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया ढासळण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. असा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

पाकिस्तान टुडे या वृत्तपत्रानेही आरएसएसच्या भगवाधारी गुंडांनी हिजाब घातलेल्या एकट्या तरुणीला घेरले यातच हिंदुत्ववादी किती भ्याड आहेत हे दिसून येते अशा बातम्या प्रसि्दध केल्या आहेत. तर द एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्येही यावर टीका करण्यात आली असून या घटनेमधून भगव्यापुढे मशीनरी किती लाचार झाल्या आहेत हेच दिसत असल्याचे म्हटले आहे. तसेच काही सत्ताधारी हिजाबला विरोध केल्याने अडचणीत आले आहेत. यामुळे स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आरएसएसला जाणीवपूर्वक भडकवण्याचे काम काहीजण करत आहेत. असे सांगत असल्याचे द एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे.

तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था TRT World नेही यावर रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यात मोदींच्या सत्तेत भारतात मुस्लीमांविरोधात हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून या समुदायाबद्दल समाजात जाणीवपूर्वक तिरस्कार निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मोदी सत्तेत आल्यामुळे त्या कट्टरपंथियांना बळ मिळाले आहे जे भारताला हिंदू राष्ट्र बनवू इच्छित आहे. असेही तुर्कीने म्हटले आहे.

बांग्लादेशमध्येही हिजाब वादाचे पडसाद उमटले आहेत. येथील ढाका ट्रिब्यूनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये अनेक नेत्यांनी हिजाबला विरोध केला आहे. या घटनेमुळे येथील अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे म्हटले आहे.

हॉंगकॉंगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये हिंदूत्ववादी भाजप हा मोदी सरकारचा पॉलराईजड् भारत आहे. यामुळे विरोधक त्यांच्यावर गलिच्छ राजकारण आणि मुस्लीम अल्पसंख्याकांना लक्ष्य बनवल्याचा आरोप करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -