घरक्राइममुलाच्या हव्यासा पोटी महिलेचे भयानक पाऊल, पीराने डोक्यात ठोकला खिळा

मुलाच्या हव्यासा पोटी महिलेचे भयानक पाऊल, पीराने डोक्यात ठोकला खिळा

Subscribe

हल्ली लोक एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये मुलाच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. तीन मुलींची आई असलेल्या या महिलेने मुलगा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कथित पीरशी संपर्क साधला.

हल्ली लोक एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये मुलाच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. तीन मुलींची आई असलेल्या या महिलेने मुलगा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कथित पीरशी संपर्क साधला. या पीरने महिलेच्या डोक्यात चक्क 2 इंच जाड खिळा ठोकला आणि दावा केला की, या वेळी फक्त मुलगाच होईल याची हमी हा खिळाच देईल. दरम्यान, या महिलेला आता रुग्णालयात दाखल केले आहे.

रुग्णालयात याबाबत तिला जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा तिने सांगितले की, तिने स्वतःच्या डोक्यावर खिळे मारले होते, परंतु नंतर सांगितले की कथित पीरने मुलगा जन्माला येण्याची हमी देण्यासाठी तिच्या डोक्यात खिळे मारले. ही महिला तपासादरम्यान, डॉक्टरकडे गेली असता, चौथ्यांदाही मुलगी होणार असल्याचे समजले. यानंतर महिलेच्या पतीने तिला धमकी दिली की, यावेळी मुलगा झाला नाही तर तो तिला घटस्फोट देईल. तिचा नवरा घटस्फोट घेईल या भीतीने ती त्या पीराजवळ गेली आणि तिने डोक्यात खिळे मारुन घेतले.

- Advertisement -

मात्र, योग्य उपचार करुन त्या महिलेच्या डोक्यातील खिळे यशस्वीरित्या काढण्यात आले आहेत. एका वृत्तानुसार, डॉ हैदर खान यांनी सांगितले की, गर्भवती महिला चिमट्याने तिच्या डोक्यावरील खिळे काढण्याचा प्रयत्न करत हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. त्यांनी सांगितले की, मुलीच्या जन्माची बातमी मिळताच पीराच्या सांगण्यावरून महिलेने आपल्या डोक्यात खिळा मारल्याचे सांगितले. डॉक्टर खान म्हणाले, ‘महिला पूर्ण शुद्धीत होती पण तिला प्रचंड वेदना होत होत्या. ‘क्ष- किरणांच्या साहाय्याने तो खिळा मेंदूत न घुसल्याचे समोर आले.

डॉक्टर खान यांनी सांगितले की, डोक्याला जड वस्तूच्या साहाय्याने खिळा मारण्यात आला. पेशावर पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीरची ओळख पटली आहे. आरोपी पीरवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलीस प्रमुख म्हणाले की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज घेतले असून लवकरच महिलेशी संपूर्ण चर्चा केली जाईल. बाज गुल असे महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान कोणत्याही गोष्टीच्या हव्यासेपोटी अशा अंधश्रध्दांना चुकूनही बळी पडू नये.त्याने आपली इच्छा तर दूरच मात्र आपल्याच धोका निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -

हे ही वाचा – जगभरात Omicron BA.2 Sub Variant थैमान घालण्याची शक्यता; WHOचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -