घरठाणेबिबट्याचे दात,नखं, कातडयाची तस्करी

बिबट्याचे दात,नखं, कातडयाची तस्करी

Subscribe

पंधरा आरोपी गजाआड, तीन बिबट्यांची  शिकार

शहापूर वनविभागाच्या शहापूर, खर्डी , वाशाळा, धसई या वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र वनअधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकांनी संयुक्त केलेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धाडसी कारवाईमध्ये वन्यजीव बिबट्यांचे तीन कातडे, नखे आणि बिबट्याची हाडे तस्करांच्या टोळीकडून हस्तगत करण्यात आली आहेत. जंगलातील तीन बिबट्यांची अत्यंत क्रुरपणे शिकार करुन त्यानंतर मृत बिबट्याची कातडे,नखं, दातांची कल्याण, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये छुप्या पद्धतीने तस्करी करणारी एक भली मोठी टोळी वनविभागाच्या जाळ्यात सापडली आहे.

बिबट्याच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी त्यांची लाखो रुपयांची बोली लावून ही तस्करी करणाऱ्या एकूण १५ आरोपींना शहापूर वनविभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इगतपुरी जवळील कुसेगाव व कसाऱ्या जवळील ओव्हळाची वाडी तसेच मुरबाड तालुक्यातील पळू गाव या ठिकाणी टोळीचे तपासाअंती धागेदोरे हाती सापडताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले आहे. तस्करी टोळीकडून वन विभागाच्या पथकाने तीन बिबट्यांची अवशेष जप्त केली आहेत. कसारा ओव्हळाची वाडी येथून तर आरोपीने मातीत गाडलेलं बिबट्याचं कातडं तर आरोपीने एका दरीत फेकलेली बिबटयाची हाडं वनविभागाच्या पथकाला हस्तगत करण्यात यश आलं आहे.

- Advertisement -

तर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बिबट्यांची एकूण ३० नखे विक्री केल्याची कबूली या तस्करांतील एका आरोपीने चौकशी दरम्यान वन अधिकाऱ्यांना दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बिबटयांच्या क्रूरपणे  शिकार करुन नंतर मृत बिबट्यांच्या अवयवांची तस्करी करणारं हे एक भलं मोठं रॅकेट नाशिक आणि ठाणे जिल्हयात कार्यरत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या बिबट्यांच्या शिकार आणि तस्करी प्रकरणी आणखी काही आरोपी हाती लागण्याची शक्यता आहे.  बिबट्यांची नखं, आणि दातं व अन्य अवयवांची कोणाकोणाला विक्री केली आहे याचा शोध वनविभागाकडून सुरु आहे.  या तस्करी टोळीतील आणखी काही आरोपी हाती लागण्याची शक्यता शहापूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -