घरताज्या घडामोडीOmicron Variant: बापरे! ओमिक्रॉनच्या फैलावानंतर जगात ५ लाख लोकांचा मृत्यू!

Omicron Variant: बापरे! ओमिक्रॉनच्या फैलावानंतर जगात ५ लाख लोकांचा मृत्यू!

Subscribe

जगभरात कोरोनाचे बरेच व्हेरिएंट पसरले आहेत. यापैकी सर्वाधिक फैलाव होणार व्हेरिएंट म्हणजे ओमिक्रॉन. ओमिक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत सर्वाधिक फैलाव होणारा असला तरी तो डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे घातक नसल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले होते. पण ओमिक्रॉनच्या फैलावानंतर ५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या आकड्यांनुसार, इतर कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत हलक्या मानला जाणाऱ्या ओमिक्रॉनमुळे अनेक लोकांना संसर्ग झाला आहे. दैनंदिन मृत्यूच्या संख्येने गेल्या वर्षी यावेळीत असलेल्या मृत्यूच्या संख्येला ओलांडले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सांगितले की, यामध्ये जवळपास १ लाख मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्ती प्रकरणांचे प्रभारी अब्दी महमूद एका ऑनलाईन प्रश्नोत्तराच्या सत्रात म्हणाले की, प्रभावी लसीकरण पाहता मृत्यू संख्या वाढणे हे दुःख आहे.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, ओमिक्रॉननंतर जागतिक स्तरावर कोरोनाच्या १३ कोटी केसेस समोर आल्या आहेत. डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी अधिक घातक आहे. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या जेनिफर नुजो म्हणाल्या की, हा व्हेरिएंट त्या लोकांसाठी चिंताजनक आहे, ज्यांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन हा कमी गंभीर आहे. यामुळे आपण थोडे निष्काळजीपणे वागत आहोत.

युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थमधील जेसन सालेमी म्हणाल्या की, तरुणांसाठी ओमिक्रॉन कमी गंभीर असू शकतो. दरम्यान गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम म्हणाले होते की, जगातील काही भागांमध्ये कोरोनाचे मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका.

- Advertisement -

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होम-क्वारंटाईनचे नियम हटवले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -