घरताज्या घडामोडीShaktimaan शो 'या' अफवेमुळे होणार होता बंद ; अरुण जेटलीने लढवली होती...

Shaktimaan शो ‘या’ अफवेमुळे होणार होता बंद ; अरुण जेटलीने लढवली होती केस

Subscribe

भारतातील सर्वांत पहिला सुपरहिरो शो शक्तिमान 16 वर्षानंतर पुन्हा येत आहे. 1997 साली दुरदर्शनवर ही लोकप्रिय मालिका ऑन एयर झाली यानंतर याची प्रसिद्धी देखील वाढू लागली.मात्र प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळालेल्या या मालिका बंद करण्यासाठी याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या.तेव्हा अरुण जेटली यांनी मुकेश खन्ना यांची मदत केली होती.

साल 2019 मध्ये अरुण जेटली यांच्या निधनानंतर मुकेश खन्ना यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर याबाबतचा एक रंजक किस्सा सांगितला होता. मुकेश खन्ना म्हणाले की, बिहारमधील बेगुसुराय येथे लहान मुलांनी स्वत:ला जाळले आणि त्यांना वाचवण्यासाठी शक्तिमान येईल अशी त्यांना आशा होती. मात्र, शक्तिमान तेथे पोहोचले नाही. अशा बातम्या वृत्तपत्रामध्ये छापून आल्या होत्या. यासह खरी घटना काय आहे? हे शोधण्यासाठी मुकेश खन्ना यांनी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली. पुढे मुकेश खन्ना म्हणाले की, शक्तिमान या मालिकेची प्रतिमा मलिन करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यावेळी तर हे प्रकरण राज्यसेभतही पोहोचले होते. यानंतर शक्तिमान ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by Sony Pictures IN (@sonypicturesin)

- Advertisement -

एका वृत्तवाहीनीने या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की ही बातमी खोटी आहे. यानंतर त्यांनी दुरदर्शन आणि यूएनआयवर पाच करोड रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला. ही केस हायकोर्टात माजी कायदा आणि अर्थमंत्री अरुण जेटील यांनी उच्च न्यायालयात लढवली होती. यानंतर मुकेश खन्ना यांच्या माहितीनुसार, चॅनल्सनी आपली चूक मान्य केली. मात्र, दूरदर्शनच्या वकिलांनी केलेल्या याचिकेवरून हा खटला सहा महिने सुरु होता.

हे ही वाचा – Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -