घरताज्या घडामोडीJhund Song : बिग बींच्या बहुचर्चित झुंडमधील 'आया ये झुंड है' हे...

Jhund Song : बिग बींच्या बहुचर्चित झुंडमधील ‘आया ये झुंड है’ हे नवं गाणं रिलीज

Subscribe

बिग बींचा बहुचर्चित सिनेमा झुंडमधील नवं गाणं रीलीज झालं आहे. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सिनेमाचं पहिलं आणि नवं गाणं व्हेलंटाईन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'आया ये झुंड है' असे या नव्या गाण्याचे बोल आहेत.

बिग बींचा बहुचर्चित सिनेमा झुंडमधील नवं गाणं रीलीज झालं आहे. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सिनेमाचं पहिलं आणि नवं गाणं व्हेलंटाईन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. ‘आया ये झुंड है’ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला अजय अतुल यांनी संगीत दिलं असून, अतुल गोगावलेने हे गाणे गायले आहे. या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. हे नवं गाणं रिलीज होताच तीन तासातच या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अतुल यांच्या अफलातून आवाजाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद देत दीड लाखांहून अधिक कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

‘झुंड’ हा सिनेमा 4 मार्चला 2022 मध्ये रीलीज होणार आहे. बिग बी आणि त्यांची ही यंगस्टर्स झुंड काय कमाल करणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.’झुंड’ या सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भुमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. टीझरमधील अमिताभ बच्चन यांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

- Advertisement -

या सिनेमातून बिग बी अनोख्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झुंड सिनेमाचे कथानक हे विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारीत आहे. त्यांनीही गरीब वस्तीमध्ये राहत असलेल्या मुलांकडून चांगली तयारी करुन एक फुटबॉलची दमदार टीम त्यांनी तयार केला. याच कथानकावर अमिताभ बच्चन यांचा नवा सिनेमा आधारित आहे.


हे ही वाचा – Sonam Kapoor चा कोट्यधीश पती वादाच्या भोवऱ्यात ; आनंद आहुजावर टॅक्स चोरीचा आरोप


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -