घरदेश-विदेशVava Suresh : 250 वेळा सापानं दंश करूनही तो वाचला, 'हे' एक...

Vava Suresh : 250 वेळा सापानं दंश करूनही तो वाचला, ‘हे’ एक औषध ठरले रामबाण

Subscribe

वावा सुरेश ज्यांनी आत्तापर्यंत जवळपास 226 किंग कोब्रा जातीच्या सापांसह 60,000 हून अधिक विविध सापांची सुटका केली आहे. यादरम्यान त्यांना 250 हून अधिक सापांनी चावले देखील आहे, यामुळे 15 पेक्षा जास्त वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. वावा सुरेश यांच्या किंग कोब्रा पकडण्याच्या धाडसाची अॅनिमल प्लॅनेट आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने देखील दखल घेतली होती. वावा सुरशे यांच्या या धाडसावर त्यांनी एक एपिसोड केला होता. मात्र अलीकडेच एका विषारी नागाने चावल्याने त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल होते. मात्र वावा सुरेश सुखरुप बरे व्हावे यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. अखेर वावा सुरेश मृत्यूला दाडेतून सुखरूप घरी परतले आहेत.

65 अँटी व्हेनममुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या सुरेश यांचे वाचले प्राण

31 जानेवारी रोजी कोट्टायमच्या कुरीची गावातील एका घरात लपलेला कोब्रा पकडत असताना कोब्राने वावा सुरेश यांच्या मांडीला चावा घेतला होता. मात्र साप चावल्यानंतरही वावा यांनी त्या सापाला गोणीत भरले, आणि त्यानंतर लोकांना त्यांनी मला दवाखान्यात दाखल करा असे सांगितले. यावेळी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच ते बेशुद्ध पडले. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. यावेळी रुग्णालयात काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान एक औषध त्यांच्यासाठी रामबाण उपाय ठरले. सुरेश यांना अँटी व्हेनम नावाच्या औषधाच्या 65 बाटल्या देण्यात आल्या होत्या. आणि याच औषधामुळे त्यांचे प्राण वाचू शकले.

- Advertisement -

वयाच्या 13 व्या वर्षापासून पकडतायत साप

मृत्यूच्या दाडेतून परत आल्यानंतरही वाव सुरेश यांनाआपले काम थांबवायचे नाही. तिरुअनंतपुरममध्ये राहणारे 48 वर्षीय वावा म्हणतात की, ते सापांना वाचवणे थांबवणार नाहीत. ते सांगतात की, जेव्हा त्यांनी शाळेत जाताना पहिल्यांदा एक बेबी कोब्रा पकडला तेव्हा ते सुमारे 13 वर्षांचे होते. उत्सुकतेपोटी वावांनी त्या सापाला जवळपास 15 दिवस आपल्या खोलीत ठेवले. मात्र त्यांच्या आईला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्या घाबरल्या. यावेळी आईने वावांना खूप फटकारले आणि त्या सापाला सोडण्यास सांगितले.

सापांना पाळीव प्राण्यांप्रमाणे घरात ठेवता येत नाही. वावांचे पार्टनर मधुसूदनन सांगतात की, एप्रिल 2010 मध्ये घडलेला एक प्रसंग त्यांना आठवतोय. काही जखमी सापांना सोडण्यासाठी ते नेय्यर वन्यजीव अभयारण्यात गेले होते. याठिकाणी त्यांनी जे काही पाहिले ते आश्चर्यकारक आणि भयानक होते. सोडलेल्या कोब्रांपैकी एक कोब्रा सरपटत वावा सुरेश यांच्या दिशेने परत आला. वावांनी ते पाहिल्यावर त्याला मिठी मारली. तो काही वेळ सापाशी बोलला आणि मग तो साप निघून गेला. ही एक अविश्वसनीय घटना होती.

- Advertisement -

अंगावर काटे आणणारी वावा सुरेश यांची कहाणी

तिरुअनंतपुरम प्राणी संग्रहालयात टॅपवार्म संसर्गामुळे एका किंग कोब्राचा मृत्यू झाला, त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या सापाला जंतमुक्त करून वाचवायचे होते. यावेळी फक्त एकच व्यक्ती होती जी हे काम करु शकत होती. सगळे घाबरले होते. वाव सुरेशने पिंजऱ्यात जाऊन सापाला प्रेमाने मिठी मारली आणि बाहेर काढले. कोब्र्याला औषध दिल्याने त्याचा जीव वाचला. वाव सुरेशच्या त्याग आणि प्रेम सांगणाऱ्या अशा अनेक घटना आहेत.

आर्थिक समस्या असतानाही बक्षीसाची रक्कम केली दान

सुरेश यांचा दयाळूपणा केवळ सापांपुरती मर्यादित नाही. त्यांचा कोणतेही नियमित उत्पन्नाचा सोर्स नसतानाही ते बचाव कार्यानंतर मिळणारे पैसे दान करतात. सरकारने त्यांना या कार्यासाठी 1 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला पण बक्षीसाची ही रक्कमही त्यांनी तिरुअनंतपुरमच्या प्रादेशिक कर्करोग केंद्राला दान केली. पूर्णवेळ नोकरी करून सर्प बचावाचे काम सुरू ठेवता येणार नाही, असा विचार करून त्यांनी वनखात्यातील नोकरीही नाकारली. नोव्हेंबर 2013 मध्ये ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स चार दिवसांच्या भारत भेटीवर आले होते, तेव्हा त्यांना केरळमधील पर्यावरणवादी आणि संरक्षकांना भेटायचे होते. सुरेश हा पाच हरित योद्ध्यांपैकी एक होता ज्यांना त्रिशूरमधील वाझाचल येथे भेटण्याची संधी मिळाली.


Hijab Row : हिजाब प्रकरणावरील कर्नाटक उच्च न्यायालयातील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -