घरताज्या घडामोडीMagh Purnima 2022 : १६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा, शुभ मुहूर्त आणि...

Magh Purnima 2022 : १६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा, शुभ मुहूर्त आणि दानाचे महत्त्व काय ? जाणून घ्या

Subscribe

सनातन धर्मात कार्तिक आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नान केले जाते. या दिवशी गंगा काठी मोठा उत्सव आयोजित केला जातो. श्रद्धाळू तिथे जाऊन पूजा, जप, तप आणि दान करतात. पौर्णिमेच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे.

हिंदू पंचागांनुसार, १६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात कार्तिक आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नान केले जाते. या दिवशी गंगा काठी मोठा उत्सव आयोजित केला जातो. श्रद्धाळू तिथे जाऊन पूजा, जप, तप आणि दान करतात. पौर्णिमेच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा, अर्चा आणि दान केल्यास आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते. जाणून घ्या यंदाच्या माघी पौर्णिमेचा मुहूर्त आणि या दिवशी दानाचे काय महत्त्व आहे.

 

- Advertisement -

माघी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

१६ फेब्रुवारी २०२२

प्रारंभ- सकाळी ९: ४२ मिनिटांनी
समाप्ती – रात्री १०: ५५ मिनिटांनी

- Advertisement -

माघी पौर्णिमेचे महत्त्व

सनातन धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. माघ नक्षत्रात गंगेत स्नान केल्यास पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती ही होते. शास्त्रानुसार, माघ पौर्णिनेला भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात वास्तव्यास असतात. त्यामुळे या दिवशी गंगेच्या पाण्याचा आपल्याला झाला तर स्वर्ग प्राप्ती होते असे म्हटले जाते.

या दिवशी गंगेच्या किनारी एका मेळाव्याचे आयोजन केले जाते. अनेक जण माघ महिन्यात गंगेच्या किनारी वास्तव्याला राहतात. गंगेच्या किनारी वास्तव्यास असलेल्या लोकांना अन्न आणि वस्त्र दान केल्याने पुण्य मिळते त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान केले पाहिजे असे सांगितले जाते.


हेही वाचा – Mahashivratri 2022 : यंदा ‘या’ दिवशी आहे महाशिवरात्र; जाणून घ्या शुभ मुहूर्त…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -