घरट्रेंडिंगPalindrome and Ambigram : आजची तारीख आहे खास ! कारण ...

Palindrome and Ambigram : आजची तारीख आहे खास ! कारण …

Subscribe

हा अंक रिलेशनशिप, पार्टनरशिपचा अंक मानला जातो. २२२ हे अंक न्यूमोरॉलॉजीनुसार अँजल नंबर मानले जातात.

22022022 Palindrome and Ambigram : न्यूमोरॉलॉजीनुसार आजचा दिवस खास आहे. कारण आजचा दिवस फार दुर्मिळ आहे. आजची तारीख २२ फेब्रुवारी २०२२ म्हणजेच २२/०२/ २०२२. आजची तारीख ही पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम तारीख आहे. आजची तारीख सरळ किंवा उलटी वाचली तरी ती एकसारखीच दिसते. म्हणजे पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम तारीख आहे. हा अंक रिलेशनशिप, पार्टनरशिपचा अंक मानला जातो. २२२ हे अंक न्यूमोरॉलॉजीनुसार अँजल नंबर मानले जातात.

२२/०२/ २०२२ आजच्या तारखेतून स्लॅश काढून टाकल्यास २२०२०२०२२ असा अंक दिसले. म्हणजेच आजच्या तारखेत फक्त शून्य आणि दोन हे दोनच आकडे आहेत. त्यामुळे आजच्या तारखेला विशेष महत्त्व आहे.

- Advertisement -

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलँड विद्यापिठातील इलेक्ट्रिक इंजिनीअर प्रोफेसर अझीझ एस. इनान यांनी म्हटले आहे की, mm-dd-yyyy या स्वरुपात पॅलिंड्रोम दिवस हा प्रत्येक सहस्त्राब्दीच्या पहिल्या काही शतकांमध्ये येतात. mm-dd-yyyyच्या फॉर्मेटमध्ये चालू सहस्त्राब्दी १ जानेवारी २००१ पासून ३१ डिसेंबर ३००० मध्ये ३६ पॉलिंड्रोम दिवस असतील. त्यातील पहिला दिवस हा २ ऑक्टोबर २००१ होता ( १०-०२-२००१ ) आणि शेवटचा पॅलिंड्रोम हा २२ सप्टेंबर २२९० असेल ( ०९-२२-२२९० )

म्हणजेच दिन महिना आणि वर्षाचा फॉर्मेटनुसार २१ व्या शतकात एकूण २९ पँलिंड्रोम दिवस आहेत. त्यातील पहिला पॅलिंड्रोम दिवस हा १० फेब्रुवारी २००१ रोजी होता ( १०-०२-२००१ ) तर शेवटचा पॅलिंड्रोम दिवस २९ फेब्रुवारी २०९२ रोजी असेल हे वर्ष लीप वर्ष असले ( २९-०२-२०९२ )

- Advertisement -

पॅलिंड्रोम म्हणजे काय ?

पॅलिंड्रोम हा ग्रीक शब्द असून. याचा अर्थ हा मागे धावणे असा होतो.रशियन भाषेत डावीकडून उजवीकडे वाचले जाऊ शकते तसेच उजवीकडून डावीकडे वाचले जाऊ शकते. जेव्हा एखादा शब्द किंवा अंक नेहमीच्या मार्गाने वाचला जातो तेव्हा त्याला रशियन भाषेत फॉरवर्ड वॉकर म्हणतात आणि जेव्हा उलट दिशेने वाचला जातो त्याला शेल वॉकर असे म्हणतात.

अँबिग्राम म्हणजे काय ?

अँबिग्राम म्हणजे एखादा शब्द शब्द अशा प्रकारे लिहिलेले असतात जे नियमिपणे किंवा उलटे वाचले तरी सारखे दिसतात. दोन्ही बाजूने वाचले जाऊ शकते असे शब्द अँबिग्राम शब्द म्हणून ओळखले जातात.


हेही वाचा –  Video : जिद्दीला सलाम ! 15 हजार फूट उंच, शून्य डिग्री तापमानात ITBP  जवानांची कौतुकास्पद लढत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -