घरताज्या घडामोडीलहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फ्लाईटमध्ये CRS अंमलात आणा, DGCA चे एअरलाईन कंपन्यांना आदेश

लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फ्लाईटमध्ये CRS अंमलात आणा, DGCA चे एअरलाईन कंपन्यांना आदेश

Subscribe

नवजात बालकांसाठी तसेच लहान मुलांसाठी हवाई प्रवासादरम्यान सुरक्षित प्रवासासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशनने नवीन मार्गदर्शके जारी केली आहे. भारतातील सर्व एअरलाईन कंपन्यांना या मार्गदर्शकांची अंमलबजावणी करण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. एखाद्या हवाई प्रवासाच्या अपघातादरम्यान लहान मुलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ही मार्गदर्शके जारी करण्यात आली आहेत. एका उपसमितीने दिलेल्या शिफारशीनुसारच या गाईडलाईन्स एअरलाईन्स कंपन्यांना अंमलात आणणे आवश्यक असेल. डीजीसीएला उपसमितीने हवाई प्रवासादरम्यान चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टिमचा वापर करण्याची महत्वाची सूचना केली आहे.

भारतातील एअरलाईन्समध्ये चाईल्ड रिस्ट्रेन्ट सिस्टिम (CRS) प्रणालीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मार्फत याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एक उपसमितीने दिलेल्या सूचनांनुसारच सीआरएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याआधी ७ ऑगस्ट २०२० रोजी केरळ कोझीकोड या एअर इंडियाच्या फ्लाईटच्या क्रॅशनंतर या समितीची नेमणूक करण्यात आली होती. उपसमितीने सुचवलेल्या मार्गदर्शकांची अंमलबजावणी करण्याबाबतची नोटीस डीजीसीएने १८ फेब्रुवारीला जारी केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी ही कर्मशिअर एअर ट्रान्सपोर्टसाठीही करण्यात येणार आहे.

- Advertisement -

चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टिम म्हणजे काय ?

डीजीसीएने जारी केलेल्या मार्गदर्शकानुसार चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टिम ही एका उपकरणासारखे काम करेल. याचा वापर सीट बेल्टच्या उद्देशासारखाच असेल. नवजात बालकांना तसेच छोट्या मुलांना हवाई प्रवासादरम्यान सुरक्षित ठेवण्यासाठीच या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विमानाच्या बसण्याच्या सीटशी संबंधितच बेल्ट आणि सुरक्षा उपकरणाचे हे कॉम्बिनेशन असणार आहे. आपल्या कारमध्ये ज्या पद्धतीने सीट बेल्ट असतो त्यानुसारच सीआरएस देखील सीट बेल्टशी जोडला गेलेला असेल. त्याचा वापर मुलांच्या सुरक्षिततेसाठी होईल.

सीआरएसची आवश्यकता का आहे ?

डीजीसीएने दिलेल्या सूचनेनुसार सीआरएसची अंमलबजावणी ही फ्लाईटमध्ये लहान मुलांच्या अतिशय सुरक्षित अशा प्रवासासाठी करण्यात येणार आहे. एखाद्या अपघाताला विरोधी यंत्रणा किंवा प्रणाली प्रवासादरम्यान अंमलात आलेली असणे या सर्वात मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टी असल्याचे डीजीसीएचे मत आहे.

- Advertisement -

एखाद्या अपघाताच्या घटनेमध्ये मुलांना ताब्यात किंवा नियंत्रणात ठेवणे हे अनेकदा पालकांना शक्य होत नाही. विशेषतः हवाई प्रवासात किंवा वेगाने होणाऱ्या आघातामध्ये किंवा जोरदार धक्क्याच्या घटनेत लहान मुलांना नियंत्रित करणे किंवा त्यांच्यावर ताबा मिळवणे शक्य होत नाही. म्हणूनच अशी प्रणालीची आवश्यकता असल्याचे मत डीजीसीएने व्यक्त केले होते.

DGCA एअरलाईन्सला आदेश

नवजात अर्भक किंवा लहान मुलासाठी सीआरएसची अंमलबजावणी ही सीटच्या ठिकाणी व्हायला हवी. एअरलाईन्सने याबाबत लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूचना करणे आणि त्यांना सीआरएसचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

त्यासाठीच एअरलाईन्स एक प्रक्रिया किंवा धोरणाची अंमलबजावणी तसेच प्रशिक्षण तसेच स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी करणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षा यंत्रणेत अशा गाईडलाईन्सचा समावेश करणेही गरजेचे आहे. सीआरएसची अंमलबजावणी या मार्गदर्शकांचा भाग असणे गरजेचे आहे. एअरलाईन कंपन्यांच्या वेबसाईटवर प्रवाशांच्या सीट्सची रूंदी आणि लांबी यासारख्या गोष्टीसह प्रत्येक श्रेणीनिहाय ही माहिती देण्याची गरज असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

कोणत्या देशात फ्लाईट्समध्ये CRS चा वापर ?

अनेक देशात सीआरएस वापरासाठी सक्तीचा नियम नाही. पण युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) च्या माध्यमातून प्रवाशांना नवजात बालकांच्या तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठीचा सीट बेल्ट वापरासाठीची मार्गदर्शके आहेत.

कॅनडातही प्रवाशांना चाईल्ड रिस्ट्रेन सिस्टिमची अंमलबजावणी ही बंधनकारक आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हीएशन एडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून मुलांना सीआरएस किंवा उपकरणाचा वापर हा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे करण्याचे आदेश आहेत. तर न्यूझीलंड सिव्हील एव्हिएशनच्या नियमांनुसार ज्या प्रवाशांसोबत लहान मुल किंवा नवजात बालक असेल अशा मुलांच्या बाबतीत संबंधित प्रवाशाच्या सीट्सशी त्या मुलाचा सीटबेल्ट जोडला गेलेला असणे गरजेचे आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -