घरट्रेंडिंगपेट्रोल-डिझेल आजही घसरलं, वाचा नवे दर काय

पेट्रोल-डिझेल आजही घसरलं, वाचा नवे दर काय

Subscribe

मुंबईत पेट्रोलचा आजचा भाव ८४ रुपये ६८ पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा भाव ७७ रुपये १८ पैसे प्रतिलिटर इतका असेल.

मुंबईमध्ये शुक्रवारी (आज) पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १४ पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा आजचा भाव ८४ रुपये ६८ पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा भाव ७७ रुपये १८ पैसे प्रतिलिटर इतका असेल. गुरुवारी मुंबई आणि दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर अनुक्रमे १६ आणि १८ पैशांनी घसरला होता तर डिझेलचा दर स्थिर होता. मात्र, आज डिझेलच्या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १९ पैशांनी स्वस्त झाले असून, पेट्रोलचा आजचा दर ७९.१८ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर, डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले असून दिल्लीत डिझेलचा आजचा दर ७३.६४ रुपये प्रतिलिटर इतका आहे. दरम्यान, इंधनाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणारी घट सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरत आहे. मध्यंतरीच्या काळात इंधनाच्या भरमसाट दरवाढीमुळे हैराण झालेले लोक आता सुखावले असणार हे नक्की.


का होतेय
दरात घट ?

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या १५ ते २० दिवसात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे. याचा लाभ तेल कंपन्या वाहनधारकांना करुन देत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -