घरताज्या घडामोडी'अच्छा जी मैं हारी चली' म्हणत माधुरीचा रेट्रो साँग व्हिडीओ व्हायरल

‘अच्छा जी मैं हारी चली’ म्हणत माधुरीचा रेट्रो साँग व्हिडीओ व्हायरल

Subscribe

माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या नुकत्यात रिलीज झालेल्या द फेम गेम या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला आहे. माधुरीची द फेम गेम ही वेब सिरीज रिलीज झालीय आणि सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Madhuri Dixit :  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिथे दररोज तिचे डेली रुटीन अपडेट देत असते. माधुरी सध्या रिल्स बनवून देखील तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. यावेळी माधुरीने रेट्रो साँग व्हिडीओ शेअर केला आहे. ‘अच्छा जी मैं हारी चली मान जाओ ना’, म्हणत माधुरी चक्क अभिनेता मानव कौलची मनधरणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या नुकत्यात रिलीज झालेल्या द फेम गेम या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला आहे. माधुरीची द फेम गेम ही वेब सिरीज रिलीज झालीय आणि सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यानच माधुरी आणि अभिनेता मानव कौल यांनी हा रेट्रो स्टाइल व्हिडीओ तयार केला आहे. माधुरीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला मधुबालाची उपमा देत तिचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

Aarya 2 : माधुरी दीक्षितने सादर केला ‘आर्या’च्या पहिल्या सीझनचा रिकॅप व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

‘द फेम गेम’ या वेब सिरीजच्या माध्ममातून माधुरी दीक्षित पहिल्यांदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. वेब सिरीजमध्ये माधुरी सोबत अभिनेता संजय कपूर मुख्य भूमिकेत आहे. दोघेही जवळपास २५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसत आहेत. माधुरी आणि संजय यांच्यास  सिनेमात अभिनेता मानव कौल, लक्ष्यवीर सरन,सुहासिनी मुळ्ये, मुस्कान जाफरी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

नृत्य बघूनच माधुरी दीक्षितला चित्रपटासाठी केलं होतं साईन!

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीने या सिनेमात अनामिकाची प्रमुख भूमिका साकारली आहे. या आधी वेब सिरीजचे नव ‘फाइडिंग अनामिका’ असे ठेवण्यात आले होते. फाइडिंग अनामिकाचा ट्रेलर देखील लाँच करण्यात आला होता. मात्र सिरीजचे नाव बदलून द फेम गेम असे ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा – Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची निळ्या साडीत ग्रेसफूल पोझ, पण साडीची किंमत वाचून बसेल धक्का

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -