घरताज्या घडामोडीRussia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात वडील मुलीचा डोळ्यात पाणी आणणारा...

Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात वडील मुलीचा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

युक्रेनमध्ये जेट आणि टॅक बॉम्ब हल्ला झाल्यानंतर युक्रेनमधील महिला आणि मुले देश सोडून गेले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर २४ तासातच देशातील महिला आणि मुलांनी देश सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले

Russia Ukraine Conflict : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर युक्रेनमध्ये आज तिसऱ्या दिवशी हल्ले सुरू आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे बॉम्बस्फोटांनी हादरुन गेले आहे. संपूर्ण युक्रेनमध्ये ह्रदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक आपल्या घरात, काही बंकर्समध्ये, रेल्वे स्टेशनवर लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक मन हेलावून टाकणारा एका वडील मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे.

रशियाने दावा केला आहे की, त्याने युक्रेनच्या एअर डिफेंस सिस्टीमवर पूर्णपणे कब्जा केला आहे. युक्रेनमध्ये राहणाऱ्या १८ ते ६० वर्षीय पुरुषांना देश सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या पुरुषांना सेनेत भर्ती केले जाणार आहे. दरम्यान आपल्या कुटुंबाला बस स्टॉपवर सोडण्यासाठी आलेला एक बाप आपल्या मुलीला शेवटचा निरोप देताना भावूक झाला. मुलगी आणि फॅमिलीला गुड बाय बोलताना तो बाप ढसाढसा रडतो. त्याचे रडणे म्हणजे युक्रेनमध्ये सध्याच्या भयावय परिस्थितीची जाणीव आहे.

- Advertisement -

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देश सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले, ‘माझी सुटका नको, दारुगोळा हवा’

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक ६ वर्षांची मुलगी आपल्या वडीलांना एक कागदाचा तुकडा देते. मुलीने दिलेल्या कागद पाहून वडील फार भावूक होतात. आपल्या मुलीला आणि पत्नीला शेवटचा निरोप देताना वडीलांच्या मनात होत असलेली चलबिचल या व्हिडीओतून पाहायला मिळतेय. आपल्या कुटुंबाला आपण पुन्हा भेटू की नाही या भितीने तो बाप मुलीला गळ्याशी घेऊन तिच्याशी शेवटचा संवाद साधतो.

ukraine russia war : केंद्राचा मोठा निर्णय; युक्रेनसाठी विमानं तयार, सर्व खर्च सरकार उचलणार, नव्या अॅडव्हायजरी जारी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एका रात्रीत व्हायरल झाला आहे. लाखो करोडो लोकांनी हा व्हिडीओ पाहून त्यांचे मन हेलावून गेले आहे. अनेक जण हा व्हिडीओ रिट्विट करत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेले लोक सुरक्षित रहावे म्हणून प्रार्थना करत आहेत.

Russia-Ukraine War: युक्रेनने महिला-मुलांना देश सोडण्याची दिली परवानगी, पण पुरुषांना युद्धासाठी थांबवले

युक्रेनमध्ये जेट आणि टॅक बॉम्ब हल्ला झाल्यानंतर युक्रेनमधील महिला आणि मुले देश सोडून गेले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर २४ तासातच देशातील महिला आणि मुलांनी देश सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत युक्रेनमधून जवळपास १ लाख लोकांनी स्थलांतर केले आहे.


हेही वाचा –  russia ukraine war : युक्रेनसोबत चर्चा करण्यास रशियाची तयारी, मात्र घातली ‘ही’ अट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -