घरक्रीडामला धोनीसारखे बनायचे आहे - कृणाल पांड्या

मला धोनीसारखे बनायचे आहे – कृणाल पांड्या

Subscribe

अष्टपैलू कृणाल पांड्याची विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. पण भारतीय संघात निवड झाली असली तरी त्याला धोनीप्रमाणे आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहे.

हार्दिक पांड्याचा अष्टपैलू कृणाल पांड्याची विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे तो प्रचंड खुश झाला आहे. तो विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल. पण त्याला भारतीय संघात निवड झाली म्हणून हवेत जायचे नाही आहे. त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहे. असे तो एका इंग्लिश प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाला.

धोनीसारखा साधेपणा हवा

कृणाल पांड्याची भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठीही निवड झाली होती. त्यावेळी त्याने धोनीसोबत काही वेळ घालवला. तो धोनीचा साधेपणा पाहून भारावून गेला. धोनीविषयी बोलताना कृणाल म्हणाला, “मी इंग्लंडमध्ये भारतीय संघाबरोबर काही दिवस होतो. मी आधी ‘भारत अ’ संघात होतो आणि नंतर माझी भारतीय संघात निवड झाली. भारतीय संघात घालवलेल्या सहा दिवसांत मी धोनीसोबत काही वेळ घालवला. त्याचे मी खूप निरीक्षण केले. अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो इतका मोठा खेळाडू असूनही त्याच्यात जो साधेपणा आहे, ते पाहून मी भारावून गेलो. तेव्हाच मी मनात ठरवले की मला धोनीसारखे बनायचे आहे.”
रोहितमुळे पदार्पण होईल सोपे
कृणाल पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माचं भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित कर्णधार असल्यामुळे पदार्पण जरा सोपे होईल असे कृणालचे मत आहे. तो म्हणाला, “मी आयपीएलमध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली खेळण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत मी आता ५०-६० सामने खेळलो आहे. तो खूपच चांगला कर्णधार आहे. तो आपल्या खेळाडूंना आपला नैसर्गिक खेळ करण्यास प्रोत्साहन देतो.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -