घरमनोरंजन'JALSA' मधील विद्या बालन आणि शेफाली शाहचा 'फर्स्ट लूक' आऊट

‘JALSA’ मधील विद्या बालन आणि शेफाली शाहचा ‘फर्स्ट लूक’ आऊट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर ‘जलसा’ या चित्रपटाचे फस्ट पोस्टर आज रिलीज झाले आहे. या चित्रपटात विद्या बालन एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे शेफाली शाह एका घरकाम करणाऱ्या बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पत्रकार आणि त्यांच्या घरात काम करणारी स्वयंपाकी बाई यांच्या जीवनातील संघर्षाची कथा सांगणारा आहे.

विद्या बालन आणि शेफाली शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘जलसा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला असून प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. विद्याने चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. यातील पहिल्या पोस्टरमध्ये विद्या बालनचे दोन लूक रिव्हिल झाले आहेत. पहिल्या लूकमध्ये विद्या बालनच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हलके हसू दिसत आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये विद्या घाबरलेली दिसतेय. पुढचा फोटो शेफाली शाहचा आहे. शेफाली शाहच्या या फोटोतून तिचं वय जास्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. तीही विद्या बालनसारखी हसतमुख आहे. मात्र या आनंदी असलेल्या शेफालीच्या मागे एक दुःखी आणि चिंताग्रस्त शेफाली दिसून येतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -


‘जलसा’मध्ये पात्रांचे दोन चेहरे दाखवण्यात येणार असल्याचे पोस्टरवरून सूचित करण्यात आले आहे. बाहेरचे जग दाखवणारा चेहरा आणि आतील वास्तव दाखवणारा चेहरा. दोन्ही पोस्टरच्या बॅकग्राऊंडला दिसणाऱ्या ब्लर लाईटिंगमधून कदाचित वेगाने धावणाऱ्या आयुष्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘जलसा’ हा चित्रपट 18 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना विद्या बालनने लिहिले की, “तिच्या हसण्यामागे खरी कथा आहे. ‘जलसा’ 18 मार्चला रिलीज होणार आहे. मी खूप उत्साहित आहे.”

- Advertisement -

विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्याशिवाय ‘जलसा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, गुरपाल सिंग आणि मानव कौल दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे ज्यांनी विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

विद्या बालनचे ‘जलसा’ या चित्रपटापूर्वी दोन चित्रपट ‘शकुंतला देवी: द ह्यूमन कॉम्प्युटर’ आणि ‘लायनेस’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. अशाप्रकारे हा सलग तिसरा चित्रपट असेल जो थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -