घरदेश-विदेशयुद्ध थांबणार की पेटणार? रशिया-युक्रेनमध्ये चर्चेला सुरुवात

युद्ध थांबणार की पेटणार? रशिया-युक्रेनमध्ये चर्चेला सुरुवात

Subscribe

रशिया-युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान बेलारूसमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांतील उच्च-स्तरीय शिष्टमंडळांमध्ये दोन देशांमधील शत्रुत्व संपवण्याच्या उद्देशाने चर्चा होत आहे. या बैठकीनंतर युद्धाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

याआधी बेलारूसमध्ये चर्चा नको असे म्हणत युक्रेनने नकार दिला होता. मात्र, आता युक्रेनने शेजारच्या बेलारूसमध्ये रशियन प्रतिनिधींना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविण्याचे सोमवारी मान्य केले. त्यानंतर या दोन देशांमधील चर्चेला सुरुवात झाली.

- Advertisement -

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या एकूण 352 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या हल्ल्यांमध्ये एकूण 1,684 जण जखमी झाले आहेत. याबाबत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. तर सुमारे ५,३०० रशियन सैनिकांना ठार केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. दरम्यान, रशियाने त्यांची हवाई हद्द 27 देशांसाठी बंद केली आहे. त्यात जर्मनी, स्पेन, इटली आणि फ्रान्सचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -