घरटेक-वेक२०२० मध्ये येणार अॅपलचा पहिला 5G फोन

२०२० मध्ये येणार अॅपलचा पहिला 5G फोन

Subscribe

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे बाजारात फास्ट नेटची मागणी वाढत आहे. 2G,3G आणि 4G नंतर आता मोबाईल कंपन्या 5G कडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांना ५ जी स्पीड मिळावा यासाठी मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत.

सेल्युलर नेटवर्किंगमध्ये प्रगती होत असल्याने ग्राहकांना मोबाईलमध्ये विविध सेवा वापरण्यासाठी मिळत आहे. या मोबाईल्स फिचर्समध्ये भर पडतच असते. मात्र इंटरनेट युजर्ससाठी मोबाईलमध्ये अजून कोणत्या सुधारणा केल्या जाऊ शकतात यावर सध्या संशोधन सुरु आहे. ग्राहकांना 2G, 3G आणि 4G नंतर आता पुढील जनरेशनचा नेटस्पीड मोबाईलमध्ये द्यावा यासाठी आता अॅपल कंपनी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना आयफोनवर 5G सेवा देण्याकडे कंपनीची वाटचाल सुरू आहे. आगामी फोन 5G नेट स्पीडला सपोर्ट करेल असा कंपनीचा दावा आहे. २०२० पर्यंत 5G ला सपोर्ट करणारा मोबाईल बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. अॅपल सोबतच मोटोरोला आणि एलजी कंपन्याही आपल्या ग्राहकांना २०१९ पर्यंत 5G फोन देण्याच्या प्रयत्नात आहेत.

किती असेल 5G चा स्पीड

4G नेटवर्कमध्ये इंटरनेटचा स्पीड हा 100MB/PS होता. याचाच अर्थ सेकंदाला १०० एमबी वापरु शकतो. मात्र 5G मध्ये हा स्पीड अजून वाढणार आहे. 5G नेटवर्कमध्ये हा स्पीड 20GB/PS येवढा असणार आहे. म्हणजेच २० जीबी प्रतीसेकंद येवढा असेल. या स्पीडमुळे गुगल मॅप,वाहनांवर लक्ष ठेवणे किंवा मोबाईलमधील इतर सेवांचे स्पीड वाढतील.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -