घरक्रीडागंभीरने बीसीसीआय, बंगाल क्रिकेटला सुनावले खडे बोल

गंभीरने बीसीसीआय, बंगाल क्रिकेटला सुनावले खडे बोल

Subscribe

ईडन गार्डन्सवरील पहिल्या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनने घंटा वाजवली हे गंभीरला आवडले नाही.

ईडन गार्डन्स येथे झालेला विंडीजविरुद्धचा पहिला टी-२० सामना भारताने जिंकला. या मैदानावरील प्रथेप्रमाणे सामन्याला घंटा वाजवून सुरुवात झाली. ही घंटा वाजवण्याचा मान मिळाला फिक्सिंगमुळे क्रिकेट सोडावे लागलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला. ही गोष्ट गौतम गंभीरला फारशी पटली नाही.

भ्रष्टाचारी माणसाला घंटा वाजवायचा मान कसा देऊ शकता?

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला २००० मध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती. पण २०१२ मध्ये त्याच्यावर घातलेली बंदी हटवण्यात आली होती. पण एकेकाळी मॅच फिक्सिंग केलेल्या अझरुद्दीनला घंटा वाजवण्याचा मान दिला याचा गौतम गंभीरला राग आला. त्याने आपले परखड मत ट्विटरवरून मांडले. ज्यात त्याने लिहिले, ‘भारताने हा सामना जिंकला. मला माफ करा पण बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांचा पराभव झाला. मला माहित आहे की अझरुद्दीनने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका लढतो. पण अशा भ्रष्टाचारी माणसाला घंटा वाजवायचा मान कसा देऊ शकता?’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -