घरमुंबईमुंबईकरांनी कोर्टाच्या निर्णयाला लावली वात

मुंबईकरांनी कोर्टाच्या निर्णयाला लावली वात

Subscribe

वेळेचे बंधन न पाळता फोडले फटाके, गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रमाण कमी

फटाके वाजविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळेचे बंधन आखून दिले आहे. या निर्णयामुळे राज्यात फटाके फोडण्यावरुनच मोठा संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुंबईत मात्र मंगळवारी वेगळे चित्र पाहायला मिळाले. मुंबईकरांनी परंपरेला महत्त्व देत न्यायालयाच्या निर्णयाला वात लावलेली दिसली. भल्या पहाटे आज अभ्यंगस्नानानिमित्त फटाके फोडून दिवाळी साजरी केली. यात अनेकांनी मोठ्या आवाजाचे फटाके देखील फोडले आहेत. तर काहींनी रात्री देखील फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन न पाळता फटाके फोडल्याचे चित्र मुंबईत सर्वत्र दिसून आले आहे. दरम्यान, मुंबईकरांनी फटाके फोडताना वेळेचे बंधन न पाळल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी गस्तीचे प्रमाणदेखील वाढविल्याचे दिसून आले आहे.

देशभरात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजविण्यास बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने वेळेचे बंधन घालून दिले आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनीदेखील कारवाईचे संकेत दिले होते. या सर्व कायदेशीर कचाट्यामुळे यंदा फटाके विक्रीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. तर काही राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध केल्यामुळे मुंबईत राजकीय आतिषबाजी रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचेच पडसाद बुधवारी मुंबईत सर्वत्र दिसून आले आहेत. मुंबईत पहाटेच सकाळी पाच वाजल्यापासून फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. यात अनेकांनी परंपरा जपत अभ्यंगस्नान झाल्यानंतर फटाके फोडले. फटाके फोडताना अनेकांनी लाल फटाक्यांनाच पसंती दर्शविली होती. काही ठिकाणी दुपारीदेखील फटाके वाजविण्यात आल्याचे मुंबईमध्ये दिसून येत होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी कोर्टाच्या निर्णयाला मात्र बगल देण्यात आल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

सकाळी अनेकांनी फटाके फोडल्यानंतर रात्रीही अनेकांनी वेळेचे बंधन न पाळता फटाके फोडल्याचे चित्र मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये दिसून आले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून फटाके फोडताना लहान मुले दिसत होती. या मुलांनी मोठ्या प्रमाणात नो डेसिबल फटाक्यांना पसंती दर्शविली जात होती. या फटाक्यांमध्ये किटकॅट फटाके अनेकांकडून उडविले जात असल्याचे चित्र दिसून आले. तर पारंपारिक फटक्यांनादेखील पसंती दर्शविण्यात आली होती. ज्यामध्ये फुलबाजे, भुईचक्र आणि पाऊस या फटाक्यांचा समावेश होता. तर मुंबईतील बहुतांश सोसाट्यामध्ये संध्याकाळी ८ ते १० या वेळेतच फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले असून कोर्टाच्या निर्णयानुसार अनेकांनी निर्णयानुसार फटाके फोडत निर्णयाचा आदरदेखील केला आहे. तर पहाटेपासूनच फटाके फोडण्याच्या घटना समोर आल्यानंतर लालबाग, परळ, दादर, सांताक्रूझ, सायन, प्रतीक्षा नगर, चेंबूर या परिसरात पोलिसांनी गस्त वाढविल्याचे चित्र मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने दिसून आले आहे.

फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी
कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात यंदा फटाके विक्री कमी झाल्याची माहिती पुढे आलेली असतानाच गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईत फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी असल्याचे मंगळवारी दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईत दिवाळी निमित्त होणारा दणदणाट देखील कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळच्या तुलनेत रात्री मात्र फटाके जास्त वाजविण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले.

- Advertisement -

हवेची गुणवत्ता ढासळली
दरम्यान, मुंबईत फटाके फोडण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर देखील झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी हवेची गुणवत्ता ही ८७ एक्यूए इतकी होती. मंगळवारी दुपारपर्यंत हेच प्रमाण १७९ एक्यूए इतके सफरकडून नोंदविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -