घरक्रीडाPAK-W vs ENG-W: इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय, भारताला मागे टाकत चौथ्या स्थानावर...

PAK-W vs ENG-W: इंग्लंडचा पाकवर दणदणीत विजय, भारताला मागे टाकत चौथ्या स्थानावर घेतली झेप

Subscribe

महिला विश्वचषक स्पर्धेतील सहाव्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा नऊ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंड संघाने भारताला मागे टाकत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उर्वरित सामने वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारतीय संघ यांच्यात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने २० ओव्हर्समध्ये एक विकेट गमावून आव्हान पूर्ण केलं.

पाकिस्तानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. शून्य धावसंख्येवर पहिली विकेट पडली. संघाची धावसंख्या ५८ धावा होईपर्यंत पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये माघारी परतले होते. अमीन आणि नवाज यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. संपूर्ण संघ ४१.३ ओव्हर्समध्ये १०५ धावांत गारद झाला. अमीनने ३२ धावा केल्या. तर सिद्रा नवाजने २३ आणि सोहेलने ११ धावा केल्या. इंग्लंडच्या ब्रंट आणि एक्लेस्टनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. कर्णधार नाइट आणि क्रॉस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाकिस्तानचे दोन फलंदाज धावबाद झाले.

- Advertisement -

इंग्लंडने २० ओव्हर्समध्ये जिंकला सामना

१०६ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. २० धावा झाल्यानंतर संघाची पहिली विकेट पडली. बेमाउंट दोन धावांवर बाद झाला. यानंतर डेनियल वॉट आणि कर्णधार हीदर नाइट यांनी ९७ धावांची सर्वोत्तम भागीदारी करत विजय मिळवला. डेनियल वॉटने ७६ आणि कॅप्टन नाइटने २४ धावा केल्या.


हेही वाचा : राज्यातील कोणत्याही विभागाला दुर्लक्षित ठेवण्याची भूमिका नाही – अजित पवार

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -