घरताज्या घडामोडीIndia corona update: देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक?, २४ तासांत ४ हजारांहून अधिक...

India corona update: देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक?, २४ तासांत ४ हजारांहून अधिक मृत्यूची नोंद

Subscribe

देशात मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दरही कमी झाला आहे. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने दोन वर्षांपासून असलेले कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे. अशा दिलासादायक वातावरणादरम्यान देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर १ हजार ६६० नव्या कोरोनाबाधित आढळले आहेत. आज मोठ्या संख्येने मृत्यूची नोंद ही काही राज्यातील मृत्यूच्या बॅकलोगमुळे झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १६ हजार ३७२ कोरोनाबाधित आढळले आहेत.

- Advertisement -

सक्रिय रुग्ण १६ हजार ७४१

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात २ हजार ३४९ जण बरे होऊन गेली आहेत. ज्यानंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ७४१ झाली आहे. या महामारी एकूण मृत्यूची संख्या ५ लाख २० हजर ८५५ झाली आहे. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ८० हजार ४३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात काल, शुक्रवारी कोरोनाचे २७५ नवे रुग्ण आढळले होते. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ३४६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. गुरुवारी हिच संख्या १३९ वर होती. तर ३रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र सक्रिय रुग्णांच्या संख्येत आज घट झाली आहे. राज्यात आज ८९२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – COVID-19 4th wave: कोरोनाची चौथी लाट येतेय; ७ राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचा फैलाव, वाचा लक्षणे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -