घरदेश-विदेशAmarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरु; मात्र 'या'...

Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरु; मात्र ‘या’ अटींचे पालन करणे बंधनकारक

Subscribe

भगवान शंकराच्या अमरनाथ यात्रेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरनाथ यात्रा जवळपास दोन वर्षांनंतर यंदा 30 जूनपासून सुरु होत आहे. ही यात्रा यावर्षी 43 दिवस चालणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाची बैठक झाली. 43 दिवस चालणाऱ्या या पवित्र यात्रेला 30 जूनपासून सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेदरम्यान सर्व कोविड प्रोटोकॉलची काळजी घेतली जाईल. परंपरेनेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेची सांगता होईल. मात्र यात्रेकरूनां देखील कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीची भीषणता पाहता श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पवित्र गुहेत बाबा अमरनाथ यांची वैदिक मंत्रोच्चारांसह पूजा केली होती मात्र भाविकांसाठी यात्रा बंद ठेवण्यात आली होती.

गेल्या वर्षी अमरनाथ यात्रेसोबतच मच्छेल माता यात्राही कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर केवळ प्रतीकात्मक हवन आणि छडी मुबारक यांना परवानगी देण्यात आली. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वतीने किश्तवाडचे उपायुक्त अशोक कुमार शर्मा यांनी मछेल यात्रा रद्द केल्याची घोषणा केली.


Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना संख्या आज दीडशेच्या आत: 140 नवे रुग्ण, 106 रुग्ण कोरोनामुक्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -