घरमहाराष्ट्रनवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; टोपे, आव्हाड यांच्याकडे सोपवला दोन खात्यांचा कारभार

नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; टोपे, आव्हाड यांच्याकडे सोपवला दोन खात्यांचा कारभार

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी राजीनामा न घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, मलिकांच्या अनुपस्थीतीमुळे आघाडी सरकारने त्यांच्याजवळील खात्यांचा कार्यभार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत.

नवाब मलिक यांच्याकडील कौशल्य विकास विभाग राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर अल्पसंख्याक विभाग डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची यासंदर्भात १७ मार्च रोजी वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मलिकांच्या खात्याचा कारभार इतर दोन मंत्र्यांवर देणार असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

याआधी नवाब मलिक ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात आले आहे. परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाचे पालकमंत्री पद प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुंबई कार्याध्यक्षपदाची जबाबदारी इतर नेत्यांवर

मलिकांच्या अनुपस्थितीत मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी पालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने दोन नवे मुंबई कार्याध्यक्ष नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. अखेर नरेंद्र राणे आणि राखी जाधव नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असतील अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -