घरताज्या घडामोडीvideo viral : तर हिंदुस्तानचा थांगपत्ताच लागणार नाही..,कव्वालीचं भाजप आमदारासमोर मोठं वक्तव्य

video viral : तर हिंदुस्तानचा थांगपत्ताच लागणार नाही..,कव्वालीचं भाजप आमदारासमोर मोठं वक्तव्य

Subscribe

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मनगवा येथे आयोजित करण्यात आलेल्या उर्स मेळाव्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्यक्रमादरम्यान कव्वालीने गात असताना भारताबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कव्वाली गाताना या कव्वालीने भारताचा थांगपत्ताच लागणार नाही, असं वक्तव्य केलंय. या कार्यक्रमात भाजपचे स्थानिक आमदार पंचूलाल प्रजापती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. तसेच हा कव्वाली कानपूरचा असून त्याने भारताबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

रीवा जिल्ह्यातील मनगवा शहरात उर्स मेळाव्याच्या संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या कार्यक्रमामध्ये कानपूर आणि मुझफ्फरपूर येथील दोन कव्वालांना बोलवण्यात आले होते. यावेळी कव्वाल नवाज शरीफने भारताबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. मोदी म्हणतात आम्ही आहोत. योगी आणि अमित शहा म्हणतात आम्ही आहोत. परंतु कोण आहे?. जर गरीब नवाजला वाटलं ना तर हिंदुस्तानाचा थांगपत्ताच लागणार नाही, कुठे होता?, अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य कव्वालीने केलंय.

- Advertisement -

दरवर्षी आयोजित केला जातो हा कार्यक्रम

दरवर्षी रीवा जिल्ह्यातील मनगवा शहरात उर्सचा मेळावा भरला जातो आणि अनवर शाहच्या समाधीवर चादर चढवली जाते. ४ दिवसांपूर्वी वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सहभागी होताना कव्वालने सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार पांचूलाल प्रजापती उपस्थित होते. परंतु आम्ही अद्याप हा व्हिडिओ पाहिलेला नाहीये. जर कोणी तक्रार केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं रेवा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवकुमार वर्मा म्हणाले.


हेही वाचा : IPL 2022: या खेळाडूच्या निवृत्तीनंतर विराट कोहली झाला भावूक, म्हणाला…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -