घरताज्या घडामोडीatmanirbhar bharat : भारत १५ लाईट कोम्बॅट हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार, ३८८७ कोटी...

atmanirbhar bharat : भारत १५ लाईट कोम्बॅट हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार, ३८८७ कोटी केंद्राकडून मंजूर

Subscribe

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील कॅबिनेट कमिटीने (CCS) ने बुधवारी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स (LCH) च्या ३ हजार ८८७ कोटी रूपयांच्या खरेदीला या समितीने मान्यता दिली आहे. भारतीय बनावटीची अशी अतिशय हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर आहेत. त्यापैकी १० हेलिकॉप्टर्स हे भारतीय वायू सेनेसाठी तर पाच हेलिकॉप्टर भारतीय सेनेसाठी असणार आहेत.

सीसीएसने मंजूर केलेल्या १५ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची मर्यादित स्वरूपाची अशी निर्मिती होणार आहे. त्यासाठी उत्पादनाचा खर्च ३ हजार ८८७ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च हा ३७७ कोटी रूपये इतका येणार आहे. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लिमिटेड सिरीज प्रॉडक्शनमध्ये भारतीय बनावटीच्या अशा ४५ टक्के सामुग्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आगामी काळात ५५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) करणार आहे.

- Advertisement -

भारत चीन सीमा आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर तिन्ही दलांची क्षमता वाढवण्यासाठी या भारतीय बनावटीच्या विमानाची निर्मिती करण्याचा मानस आहे. त्यामुळे भारताची शत्रूसोबतची लढा देण्याची क्षमता वाढणार आहे. तिन्ही दलांसाठी कोम्बॅटिंगची क्षमता यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.

सर्व प्रकारच्या वातावरणात अतिशय सर्वोच्च कामगिरी करणारे हे हेलिकॉप्टर आहे. त्यामध्ये कोम्बॅट सर्च ऑपरेशन तसेच रेस्क्यू अशा पद्धतीचे (CSAR) चे या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य आहे. तसेच शत्रूच्या एअर डिफेन्सचा समाचार घेणे, काऊंटर इनर्सजन्सी ऑपरेशन राबवणे यासारखी हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हेलिकॉप्टरचा वापर हा हाय अल्टीट्यूट बंकर बस्टिंग ऑपरेशनमध्येही करता येतो. तसेच जमीनीवर सेनेला मदतीसाठीही हेलिकॉप्टर उपयुक्त आहे. तसेच जंगल आणि शहरी भागातही हेलिकॉप्टरच्या मदतीने ऑपरेशन राबवणे शक्य आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रत्रानाचा वापर करण्याचा सरकारचा मानस आहे. देशातील संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या इंडस्ट्रीला यामुळे चालना मिळेल असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहेत वैशिष्ट्ये ?

स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचा वापर हा हेलिकॉप्टरच्या निमित्ताने करण्यात आला आहे. त्यामध्ये रिड्युस व्हिज्युअल, ऑरल, रडार आणि आयआर सिग्निचर तसेच क्रॅशवर्थीनेस फीचर्स हे अपघाताच्या काळात हेलिकॉप्टरला योग्य सुरक्षा देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहेत. आगामी काळातील तीन ते चार दशके हेलिकॉप्टर उपयुक्त असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोणत्या तंत्रज्ञानाचा समावेश ?

– ग्लास कॉकपीट
– कॉम्पोसीट एअरफ्रेम स्ट्रक्चर
– एडव्हान्स कटिंग एज टेक्नॉलॉजी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -