घरताज्या घडामोडीGold-Silver Price: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीत घसरण ; जाणून...

Gold-Silver Price: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीत घसरण ; जाणून घ्या दर

Subscribe

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ८१२ रूपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर ६७ हजार ४७ रूपयांवर पोहोचला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०० रुपयांनी घसरून ५१,८१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने ५१,७१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाले होते. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव २५२ रुपयांनी घसरल्यानंतर ६७,०४७ रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव ६७,२९९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

- Advertisement -

कसे जाणून घ्याल सोन्याचा भाव?

तुम्ही घरबसल्या सुद्धा सोन्याचे भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मॅसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.

बुधवारी सोन्याचा भाव ४७१६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. ऑगस्‍ट २०२० मध्‍ये सोन्याने सार्वकालिक उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव ५६२०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याचवेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे १२ हजार ९९० रुपये प्रति किलो दराने स्वस्त होती. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक ७९९८० रुपये प्रति किलो इतका होता.

- Advertisement -

हेही वाचा : ॲड. सतीश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -