घरमहाराष्ट्रबलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी, भंडारा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी, भंडारा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Subscribe

देशात पहिल्यांदाच डीएनए चाचणीच्या मदतीने बलात्कार पीडितेला न्याय देण्यात आला आहे. 13 वर्षांपूर्वी बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी देण्याचे आदेश भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. संबंधित मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत ५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश आहेत. त्यासाठी आरोपीच्या अचल संपत्तीवर न्यायालयाने 8 लाख रुपयांचा बोजा चढवला आहे. न्यायाधीश आर. एस. भोसले नरसाळे यांनी हा निर्णय दिला आहे.

भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने जिल्हाधिकारींना आदेश द्यावा आणि संपत्ती विकून पोटगी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या प्रकरणात मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर भंडारातील न्यायाधीश आर. एस. भोसले नरसाळे यांनी आरोपीच्या कुटुंबाला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. पोटगी न दिल्यास आरोपीच्या संपत्तीचा लिलाव करून पोटगीची रक्कम वसूल करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे. मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत ५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश आहेत. सोबतच तहसीलदारांना बोलावून त्या आरोपीच्या शेतजमीनीवर ८ लाखांचा बोजा न्यायालयाने चढवला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -