घरदेश-विदेशकेंद्रीय अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला; पोलिसांकडून तपास सुरु

केंद्रीय अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला; पोलिसांकडून तपास सुरु

Subscribe

राष्ट्रीय राजधानीच्या लाजपत नगर परिसरात केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांना गाडीची काच फोटून गाडीतून महत्त्वाच्या कागदपत्रांसह विभागाचे स्टँम्प आणि ऑफिसच्या चाव्या चोरी केल्या आहेत. 31 मार्च रात्री साडे आठ वाजता ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास सुरु केला, परंतु आरोपी अद्याप सापडलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिर्बान गुहा असे पीडित अधिकाऱ्याचे नाव आहे. केंद्रीय पशुपालन मंत्रालयाचे ते सहाय्यक आयुक्त आहे. त्यांनी सांगितले की, 31 मार्च रोजी त्यांची कार अचानक बंद पडली. म्हणून ते मॅकेनिकच्या शोधात कारमधून खाली उतरले. पुन्हा येऊन पाहता तर त्यांच्या कारची काच कोणीतरी फोडली होती. तसेच कारमधील बॅग आणि इतर महत्त्वाच्या वस्तू चोरी झाल्या होत्या.

- Advertisement -

त्या बॅगमध्ये केंद्रीय पशुपालन मंत्रालय विभागाचे तिकिट, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, कार्यालय आणि घराच्या चाव्यासह 10000 रुपयांचे अन्य सामान चोरीला गेले आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


Jammu Kashmir खोऱ्यात 79 परदेशींसह 172 दहशतवादी सक्रिय; भारतीय लष्कराची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -