घरताज्या घडामोडीपोलीस आयुक्त दीपक पांडेंनी महसूल विभागासंदर्भात लिहिलेलं पत्र वादाच्या भोवऱ्यात, गृह विभागाची...

पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी महसूल विभागासंदर्भात लिहिलेलं पत्र वादाच्या भोवऱ्यात, गृह विभागाची नोटीस

Subscribe

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसुली विभागासंदर्भात लिहिलेल्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीत हे पत्र वाचून दाखवले. परंतु पोलीस अधिकाऱ्यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

महसुल विभागासंदर्भात वादग्रस्त पत्र लिहिल्याप्रकरणी दीपक पांडेंना गृह विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडे शिवसेनेचे संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. दीपक पांडे हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जातात. त्यामुळे सध्या दीपक पांडे हे अडचणीत असल्यामुळे ते संजय राऊतांकडे मदत मागण्यासाठी आलेत का?, अशा प्रकारची चर्चा जोरदार पद्धतीने रंगत आहे.

- Advertisement -

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डीटोनेटरसारखे आहेत. त्यामधून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवीतास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यासह ठाणे, पुणे आणि नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या संपूर्ण जिल्ह्यांना पोलीस आयुक्तालय घोषित करावं, अशी मागणी देखील दीपक पांडेंनी केली आहे. एकाच जिल्ह्यामध्ये दोन यंत्रणा असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे दंडाधिकारी शाखा आणि पोलीस आयुक्त कार्यालयात असणारी दंडाधिकारी शाखा यांच्या कामाचे स्वरूप एकच असल्यानं जिल्हा दंडाधिकारी शाखा पोलीस आयुक्त कार्यलयात विलीन कराव्यात, असं देखील पांडेंनी पत्रात म्हटलं होतं.

- Advertisement -

पत्रातील भाषा चुकीची नाही – दीपक पांडे

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंना गृह विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर दीपक पांडेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शासन स्थरावर विचारविनिमय करण्यात यावं, यासाठी हे पत्र लिहिण्यात आलं होतं. जर मंत्रिमंडळाने त्यावर विचार केलं असेल तर मला त्यामध्ये समाधान आहे. मी पत्र योग्य योग्य असून खूप अभ्यासपूर्वक लिहिण्यात आलं आहे, असं दीपक पांडे म्हणाले.

माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये जे मला अनुभव आलेलं आहे. ते या पत्रात मी नमूद केलेलं आहे. तसेच हे पत्र जनतेच्या भल्यासाठी लिहिण्यात आलं होतं. मात्र, हे पत्र मिडियामध्ये व्हायरल कसं झालं. याबद्दल मला माहिती नाही. मात्र, अशा गोष्टी जर व्हायरल होत असतील तर यासाठी मी जबाबदार नाही. तसेच या पत्रामध्ये मी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही. हे पत्र मी फार विचारपूर्वक लिहिलं आहे, असं पांडे म्हणाले.


हेही वाचा : खासदार संजय राऊतांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -