घरपालघरउत्तन समुद्रकिनारी तीनशे किलोचा मृत डॉल्फिन

उत्तन समुद्रकिनारी तीनशे किलोचा मृत डॉल्फिन

Subscribe

भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनारी तब्बल २५० ते ३०० किलो वजनाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची नोंद घेऊन किनाऱ्यावर त्याचे दफन केले.

भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनारी तब्बल २५० ते ३०० किलो वजनाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची नोंद घेऊन किनाऱ्यावर त्याचे दफन केले. उत्तनच्या वेलंकनी तिर्थमंदिर जवळील समुद्रकिनारी मृतावस्थेतील डॉल्फिन मासा आढळून आल्याची वर्दी उत्तन सागरी पोलिसांना मिळाली. हा मासा कुजलेल्या अवस्थेत होता. शासनाच्या कांदळवन विभागास याची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल चेतना शिंदे, वनपाल सचिन मोरे यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत डॉल्फिनचा पंचनामा करून किनाऱ्यावरच जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात त्याचे दफन करण्यात आले. डॉल्फिन हा साडेसात फूट लांब व सुमारे २५० ते ३०० किलो वजनाचा असल्याचे वन विभागाने सांगितले. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी लाटांनी त्याचा मृतदेह किनारी लागल्याचे सांगण्यात आले.

भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनाऱ्यासह भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क कोळीवाडा व पश्चिम धक्का येथे देखील गेल्या काही काळात डॉल्फिन मासे मृतावस्थेत सापडले आहेत. उत्तन समुद्रात तसेच भाईंदरच्या खाडीत डॉल्फिनचा वावर असतो. अनेकवेळा डॉल्फिन दिसून आले आहेत. समुद्रकिनारी व खाडीतील पाण्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मत्स्य पैदास प्रचंड कमी झाली असून जलप्रदूषण हे भाईंदरमधील डॉल्फिन माशांच्या मृत्यूचे कारण मानले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

दोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात; किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -