घरमहाराष्ट्रदोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात; किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा

दोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात; किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा

Subscribe

न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे. मी होमवर्क केलेला आहे. हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव आणि त्याच बरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या किती कंपन्यांतून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर, तेजस ठाकरे किती मनी लाँड्रिंग केलं आहे, याचा हिशेब उद्धव ठाकरे देणार नसल्यास किरीट सोमय्या देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मुंबईः भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. INS विक्रांत घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिलाय. त्यानंतर किरीट सोमय्या आज मुंबई विमानतळावर दाखल झाले, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिलाय. दोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात येत आहे. हसन मुश्रीफांच्या केसवर चौकशी सुरू आहे. तसेच यशवंत जाधव असे मिळून तिघांच्या केसला गती मिळेल, असंही त्यांनी सांगितलंय.

तसेच पत्रकारांनी कुठे गेला होतात विचारल्यानंतर ते म्हणाले, काही वेळेला होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागतं. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला सूट द्यावी, जेणेकरून आणखी खोल खड्डा त्यांनी खणावा. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून एफआयआर लिहायची, अजून ही तर सुरुवात आहे. न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे. मी होमवर्क केलेला आहे. हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव आणि त्याच बरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या किती कंपन्यांतून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर, तेजस ठाकरे किती मनी लाँड्रिंग केलं आहे, याचा हिशेब उद्धव ठाकरे देणार नसल्यास किरीट सोमय्या देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. फक्त दिलासा दिलाय एवढं नाही. पण त्यांनी जे प्रश्नचिन्ह उभं केलं, तोच प्रश्न मी गेल्या आठ दिवस उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओचं काम फक्त माफियागिरी करायला लावायची, खोटा एफआयआर करायला लावायची, अटक करून जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरायची. हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे. विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. 58 कोटींची भाषा संजय राऊतने वापरली होती. आठवा आरोप आणि आठही आरोपातील एकामध्येही कागद नाही, पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची. दोन-पाच दिवस मीडिया अटेन्शन मिळवायचं. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे, असंही सोमय्या म्हणालेत.

विशेष म्हणजे किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय, त्यावर किरीट सोमय्या म्हणाले, न्यायालयाच्या भावनेच्या विरुद्ध ते आंदोलन करत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो, हे जे नाटक चाललेलं होतं, गेले चार ते पाच दिवस ते उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. संजय राऊत प्रवक्ता आहे. मास्टरमाईंड उद्धव ठाकरे आहेत. ठाकरेंच्या पोरांचे, त्यांच्या पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर यायला लागले. काहीही करून किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका आणि त्याचं तोंड बंद करा. उद्धव ठाकरे साहेब आपले डर्टी डझन जे घोटाळे बाहेर येणार, काढणार आणि शिक्षा होईपर्यंत किरीट सोमय्या असाच सक्रिय राहणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केलाय.

- Advertisement -

हेही वाचाः होय, मी बैल खायचो; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद उद्भवणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -