टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजानं आतापर्यंत चौकार आणि षटकार मारत 4, 6 धावा काढल्या आहेत. मात्र इंडियन प्रिमीयर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी एका चेंडूवर 4 धावा काढल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामाना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी इतिहास घडवला.
या सामन्यात बटलर आणि पडिक्कल या दोघांनी धावून चार धावा काढल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, एखाद्या फलंदाजानं धावून चार धावा पूर्ण केल्या आहेत. नाणेफेक गमावून राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल मैदानात होते.
#JosButtler #DevduttPadikkal ran four runs
Incredible #IPL2022 #RRvsKKR pic.twitter.com/No9HK41HHM
— Raj (@Raj93465898) April 18, 2022
या षटकातील अखेरच्या चेंडूवर बटलरनं प्वाइंटच्या दिशेनं जोरदार शॉट मारला. या चेंडूवर व्यंकटेश अय्यर चांगलं क्षेत्ररक्षण करत चौकार वाचवला. पण त्याचा थ्रो यष्टिरक्षकाकडे पोहचण्याआधीच बटलर आणि पडिक्कलनं धावून चार धावा काढल्या.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता आणि राजस्थान यांच्यात सामना झाला. खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला.
हेही वाचा – केकेआरच्या श्रेयस अय्यरला थेट लग्नाची मागणी; सामन्यादरम्यान तरुणी झाली फिदा