घरताज्या घडामोडीबोगस क्रमांकावरुन येणाऱ्या कॉल्सबाबत ठाणे महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

बोगस क्रमांकावरुन येणाऱ्या कॉल्सबाबत ठाणे महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

Subscribe

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने +९१ ८१६७२ ८३९१० या बोगस संपर्क क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवकांना कॉल व एसएमएस करण्यात येत आहेत. त्यातच काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. तरी या बोगस संपर्क क्रमांकास प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून + ९१ ८१६७२ ८३९१० या बोगस क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवक तसेच नागरिकांना संपर्क करण्यात येत आहे. यामध्ये व्हाट्सएप खाते देखील उघडण्यात आले असून यावर महापालिका आयुक्तांचा फोटो लावण्यात आला आहे.

- Advertisement -

या क्रमांकावरून काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. सदरचा क्रमांक बोगस असून याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी सदरच्या बोगस संपर्क क्रमांकास नागरिकांनी प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.


हेही वाचा : Twitter-Elon Musk Deal: एलन मस्क दोन पाऊल पुढे, ३२७३ अब्ज रुपयांना खरेदी करू शकतात ट्विटर, जाणून घ्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -