घरताज्या घडामोडीकाँग्रेसच्या चिंतन शिबिरापूर्वी G-23 ची समजूत काढण्याचा प्रयत्न, सोनिया गांधींनी बड्या नेत्यांवर...

काँग्रेसच्या चिंतन शिबिरापूर्वी G-23 ची समजूत काढण्याचा प्रयत्न, सोनिया गांधींनी बड्या नेत्यांवर सोपवल्या जबाबदाऱ्या

Subscribe

काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसला पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये १३ ते १५ मे दरम्यान काँग्रेसने चिंतन शिबीराचे आयोजन केलं आहे. या बैठकीला नव संकल्प चिंतन शिबीर असे नाव देण्यात आले आहे. या चिंतन शिबीरात पक्षातील सहा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक आव्हाने तसेच शेतकरी, तरुणांकडून पक्ष संघटनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचे बदल आणि रणनीती यावर चर्चा करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या चिंतन शिबीरापूर्वी जी-२३ नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गंधी यांनी एकूण ६ समित्या स्थापित केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पक्षात जे नेते नेतृत्वावर नाराज आहेत असे जी-२३ मधील ५४ नेत्यांची मधरणी करण्यात येत आहे. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर यांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना राजकीय व्यवहार समितीचे निमंत्रक बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

नव्या समितीमध्ये गुलाम नबी आझाद, शशी थरूर, अशोक चव्हाण आदी नेत्यांना यात स्थान देण्यात आले आहे. पी चिदंबरम यांना आर्थिक व्यवहार समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. यात आनंद शर्मा, सचिन पायलट यांच्यासह एकूण ९ नेते आहेत. सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष सलमान खुर्शीद असतील. संघटनेवर स्थापन करण्यात आलेली समिती मुकुल वासनिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूपेंद्रसिंग हुडा आणि तरुणांच्या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या समितीची कमान राजा वडिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. या समित्यांची लवकरच बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चिंतन शिबीराचा प्रस्ताव ठेवला होता. २०१३ मध्ये राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवल्यानंतर जयपूरमध्ये काँग्रेसचे शेवटचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Petrol Diesel Price: सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -