घरअर्थजगतLIC IPO Open : प्रतीक्षा संपली! LIC चा IPO 'या' दिवशी होणार...

LIC IPO Open : प्रतीक्षा संपली! LIC चा IPO ‘या’ दिवशी होणार लाँच, असा करा अर्ज

Subscribe

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या लाँचिंगची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC चा IPO 4 मे रोजी लाँच होणार असून 9 मे पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये अर्ज करू शकतील. या IPO च्या माध्यमातून सरकार सार्वजिनक क्षेत्रातील कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला यातून 21 हजार कोटी रुपयांचे मिळणार आहे. IPO वर आधारित LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. या संदर्भात मंगळवारी एलआयसी बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात लाँचिंगच्या तारखेवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल का?

- Advertisement -

LIC ने SEBI कडे जमा केलेल्या DRHP मधील IPO साठी 5 टक्केपर्यंत स्टेक विकण्याची परवानगी घेतली होती. जो आता 3.5 टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी IPO आणण्याची अंतिम तारीख 12 मे आहे. यानंतर पुन्हा सेबीची परवानगी घ्यावी लागेल. अशा स्थितीत त्याआधी आयपीओ लॉन्च करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जेव्हा LIC IPO बद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा सरकारने त्याचे मूल्यांकन 17 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण आता IPO ला टक्कर देण्यासाठी LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये झाले आहे.

- Advertisement -

21000 कोटी रुपये उभारण्याची तयारी

याआधी सरकार देशातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीतील 5 टक्के स्टेक विकणार होते, पण आता IPO द्वारे फक्त 3.5 टक्के स्टेक ऑफर केला जाईल. IPO साठी LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. त्यानुसार आता या IPO चा आकार 21,000 कोटी रुपये असेल. बाजारातील मागणी चांगली असेल, तर सरकार त्यात ५ टक्के वाढ करू शकते, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहेत. 13 फेब्रुवारी रोजी सेबीकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये (DRHP) सरकारने 31.62 कोटी शेअर्स ऑफर करण्याचा प्रस्ताव दिला होता, जे एकूण इक्विटी शेअर्सच्या सुमारे 5 टक्के होते.

रुसो-युक्रेन युद्धामुळे विलंब

सरकारी विमा कंपनीचा हा IPO सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. LIC IPO लाँच होण्यास आधीच अनेक महिने उशीर झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धासह अनेक कारणांमुळे काही काळ बाजारात विक्री सुरू आहे. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


Russia Ukraine War : रशियाची धमकी ठरली पोकळ! अमेरिकेची युक्रेनला 16.5 कोटी डॉलरचा दारूगोळा देण्यास मंजुरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -