घरताज्या घडामोडीजिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती, जलसंधारण, आदिवासी विकास, या क्षेत्रांबरोबरच शहरातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारत आहेत. सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात अनेक योजना प्रगतीपथावर असून त्यातील काही योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठण्यात दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत येथील पोलीस मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जय जित सिंह, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, कोकण परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम देशमाने आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, ठाणे महापालिका सुरक्षा दल आदींनी मानवंदना देऊन संचलन सादर केले. पालकमंत्री शिंदे यांनी संचलनातील दलाचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी दिवंगत आणि शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराशी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पोलीस बांधवांच्या परिवारातील सदस्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.

महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री शिंदे म्हणाले की, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन्ही चाके समानरितीने चालत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास होत आहे. कोवीड काळात जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस दलानेही एकदिलाने अतिशय उत्तम काम केले आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या वर्षभरात अतिशय उल्लेखनीय काम केलं असून त्या बळावर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

- Advertisement -

सर्वोकृष्ट जिल्ह्याचा तृतीय क्रमांक ठाणे जिल्ह्याला महाआवास अभियान २०२०-२१ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील सर्वोकृष्ट जिल्ह्याचा तृतीय क्रमांक ठाणे जिल्ह्याला जाहीर झालाय. तसेच ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ गटात भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोकृष्ट विभागातील प्रथम पुरस्कार कोकण विभागाला जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेतून सुमारे ९ हजार ६१० घरे बांधली आहेत. राज्य शासनाने राबविलेल्या महाआवास अभियान टप्पा २ मध्ये १७५ घरकुले पूर्ण झाली आहेत. या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महापालिकांचे केले अभिनंदन

राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी अभियानामध्ये यंदा जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवरील कोविड इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. तर ठाणे स्मार्ट सिटीचा समावेश देशातील १०० शहरांमधील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. ‘डिजी ठाणे’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले .

 जिल्ह्याचा नियतव्यय ६१८ कोटी रुपये

शिंदे म्हणाले की, सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला ४५० कोटींचा निधी दिला होता. हा सर्व निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यांतील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार आगामी वर्षासाठी अतिरिक्त १४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४७५ कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये या विशेष निधीची भर पडली असून आता जिल्ह्याचा एकूण नियतव्यय ६१८ कोटी रुपयांचा झाला आहे.

राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीसांचा तसेच स्काऊट गाईडमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थी शिक्षक, जिल्हा परिषदेचा स्व. आर.आर. आबा सुंदर गाव अभियानातील विजेत्या गावांचा, स्मार्ट ग्राम योजना, आदी विविध योजनेतील विजेत्यांचा, महानगरपालिकेच्या उत्कृष्ट कर्मचारी यांचा पालकमंत्री श्री. शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष दालनाला पालकमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी मुख्य शासकीय समारंभाच्या ठिकाणी ठाणे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांसह भेट घेऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.


हेही वाचा : भोंगा कमळाला किती त्रास देतोय ते आगामी काळात समजेल, सुभाष देसाईंची बोचरी टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -